सीओपीडी

सीओपीडीवर उपचार (उपचार)

सीओपीडी बरा होत नाही, परंतु त्यासाठी असे उपचार आहेत ज्यामुळे तुम्ही तो नियंत्रणात ठेवू शकता, आणि तुम्हाला सीओपीडी आहे म्हणून केवळ तुम्ही परीपूर्ण जीवन जगू शकणार नाही असे नाही.  योग्य औषधोपचार, व्यवस्थित आहार, आणि जीवनशैलीतील बदल याद्वारे तुम्ही सहज सीओपीडीचे व्यवस्थापन करू शकता.

ए) धूम्रपान करू नका

तुम्ही धूम्रपान करत असल्यास, ते बंद करा. तुमच्या जीवनशैलीत तुम्ही हा एकमेव बदल करण्याची आवश्यकता आहे.  तुम्हाला धूम्रपानाची सवय कितीही काळ असली तरी सुद्धा त्यापासून दूर राहिल्यास, तुमच्या फुफ्फुसांच्या उतींना झालेली हानी कमी करण्यास मदत होऊ शकते. आता अशी ही उत्पादने उपलब्ध आहेतजी तुम्हाला धूम्रपान बंद करण्यास मदत करू शकतात. तुमचे डॉक्टर तुम्हाला त्याची माहिती देऊ शकतील.

बी) फुफ्फुसांना क्षोभकारी घटक टाळा

धूम्रपानाव्यतिरिक्त, इतरही काही घटक असू शकतात जे तुमच्या फुफ्फुसांना क्षोभ करू शकतात जसे दुय्यम स्वरूपाचे धूम्रपान, केमिकल्सचा धूर आणि धूळ, जे टाळले पाहिजेत.

सी) योग्य औषधे नियमित घ्या

औषधोपचारांमुळे लक्षणे कमी होऊ शकतात आणि ती वाढण्याची शक्यता कमी होते.  सीओपीडीच्या औषधोपचारांमुळे वायूमार्गांना २ प्रकारे मदत होते- त्यामुळे ते रूंद होतात आणि सूज कमी होते. सीओपीडीवरील सर्व आधुनिक औषधे अतिशय प्रभावी आहेत, आणि त्यामुळे तुमच्या जीवनाच्या दर्जात सुधारणा होण्यास मदत होते. बहुतेक औषधे इन्हेलेशनच्या (श्वासावाटे घेण्याच्या) स्वरूपात उपलब्ध असतात - कारण इन्हेलर्स सुरक्षित असतात. लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधोपचार (डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे) नियमित घेण्याची गरज असते.

कधीकधी सीओपीडीमुळे रक्तातील प्राणवायूची पातळी कमी होऊ शकते. तुम्हाला ह्यासंबंधी चिंता होण्यापुर्वी पुरवणी प्राणवायूच्या सहाय्याने तुम्ही ही समस्या सहज हाताळू शकता.

डी) लसी

सीओपीडी असलेल्या व्यक्तींना फुफ्फुसांचा संसर्ग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला दर वर्षी फ्लूची लस घ्यावी लागेल.

Please Select Your Preferred Language