ऍलर्जीक राहिनाइटिस

ऍलर्जीक राहिनाइटिस म्हणजे काय?

तुमच्या आजूबाजूला धूळ किंवा धूर असताना तुम्हाला वारंवार शिंका येत असल्याचे तुमच्या निदर्शनास आले आहे का? होय असल्यास, तुम्हाला त्याची अॅलर्जीची असण्याची दाट शक्यता आहे.

तुमच्या शरीराची संरक्षण यंत्रणा (ज्याला प्रतिकार यंत्रणा म्हणतात) ती जंतू (विषाणू आणि बॅक्टेरिया) यासारख्या अपायकारक गोष्टींशी लढा देण्यास आणि तुमचे रक्षण करण्यास मदत करते. तुम्हाला कशाची अॅलर्जी झाल्यास, त्याचा अर्थ तुमची यंत्रणा तुमचे अशा गोष्टीपासून रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे जी अजिबात अपायकारक नाही - उदा. रोपांमधील आणि झाडातील डस्टर पोलन आणि तत्सम, ठराविक अन्नपदार्थ. अॅलर्जीचा शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम होऊ शकतो, उदा. त्वचा, डोळे आणि नाक.

‘‘तुम्हाला कशाची अॅलर्जी झाल्यास, त्याचा अर्थ तुमची यंत्रणा तुमचे अशा गोष्टीपासून रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे जी अजिबात अपायकारक नाही.’’

अॅलर्जीज अतिशय सामायिक असतात आणि त्याचा कोणालाही त्रास होऊ शकतो. परंतु, तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला अॅलर्जीजचा इतिहास असल्यास, तुम्हाला देखील अॅलर्जी होण्याची अधिक शक्यता आहे.

अॅलर्जिक र्हनिटस म्हणजे खास करून नाकावर परिणाम करणारी अॅलर्जी. तुम्हाला अॅलर्जी असलेली एखादी गोष्ट तुम्ही श्वासावाटे आत घेतल्यास लक्षणे दिसण्यास सुरूवात होते.याला अॅलर्जेन्स म्हणतात. सर्वाधिक सामायिक अॅलर्जेन्स आहेतः

  • पोलन आणि धूर यासारखे बाहेरील अॅलर्जेन्स.

  • घराच्या आतील अॅलर्जेन्स म्हणजे धुळीचे कण, पाळीव प्राण्यांचे केस किंवा डँडर आणि मोल्ड (फंगस)

  • इतर क्षोभकारक जसे सिगरेटचा धूर, पफ्र्युम्स, रसायने आणि एक्झॉस्ट फ्युम्स

साधारणपणे, अॅलर्जिक र्हनिटसचे दोन प्रकार आहेत - हंगामी आणि बारमाही

हंगामी अॅलर्जिक र्हनिटस हा वर्षातील ठराविक कालावधीत तुम्हाला लक्षणे दिसू लागतात आणि त्याची स्थिती अधिक खराब होते. तुमचे अॅलर्जेन हे पोलनसारखे असतात तेव्हा हे अधिक सामायिक असते, जे वर्षातील ठराविक कालावधीत अधिक प्रमाणात असतात.

दुसरीकडे बारमाही अॅलर्जेन र्हनिटस म्हणजे तुम्हाला संपूर्ण वर्षभर लक्षणे राहतात. तुम्हाला धूळ, धूर, धुळीचे कण वगैरेसारख्या गोष्टींची अॅलर्जी असते ज्या संपूर्ण वर्षभर अस्तित्वात असतात.
 

 

For more information on the use of Inhalers, click here

Please Select Your Preferred Language