आमच्याबद्दल

ब्रिदफ्री विषयी

ब्रिदफ्री ही सिप्ला द्वारा जुनाट वायूमार्गाचा आजार असलेल्या रूग्णांसाठी राबविला जाणारा सार्वजनिक सेवा उपक्रम आहे. सिप्लाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ह्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. आज ब्रिदफ्री ही श्वसनसेवा क्षेत्रातील रूग्णांची सर्वसमावेशक पाठबळ यंत्रणा आहे.

अस्थमा, सीओपीडी आणि अॅलर्जिक ऱ्हनिटिस सारख्या वायूमार्गाचे आजार असलेल्या रूग्णांना सहाय्य करण्यास ब्रिदफ्री बांधिल आहे. ह्यात निदान, समुपदेशन, आणि उपचारांचे पालन ह्या क्षेत्रातील रूग्णांच्या संपूर्ण प्रवासाचा समावेश आहे. गेले अनेक वर्ष, श्वसनाच्या समस्या असलेली प्रत्येक व्यक्ती कसे सामान्य आणि सक्रिय जीवन जगू शकते ह्याविषयी जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी ब्रिदफ्री द्वारा विविध उपक्रमांचे आणि शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

आपली ब्रिदफ्री क्लिनिक्स, केमिस्टस आणि समुपदेशन केन्द्रांच्या नेटवर्कच्या सहाय्याने, ब्रिदफ्रीने लोकांचा एक समाज निर्माण केला आहे ज्यांनी आपल्या श्वसनाच्या समस्यांवर यशस्वीरित्या मात केली आहे आणि संपूर्ण निरोगी जीवन जगण्याचा मार्ग शोधणाऱ्या व्यक्तींसाठी एक पाठबळ यंत्रणा निर्माण केली आहे.

www.breathefree.com हे जुनाट वायूमार्गाच्या आजाराशी संबंधित एकाच ठिकाणी संपूर्ण माहिती उपलब्ध असलेले व्यासपीठ आहे. ह्या वेबसाईटवर अस्थमा, सीओपीडी आणि अॅलर्जिक ऱ्हनिटिस यासारख्या समस्यांसाठी माहिती, निराकरणे आणि पाठबळ पुरविले जाते. त्याचप्रमाणे, वेबसाईट कौन्सेलर्सशी (समुपदेशकांशी) संपर्क साधण्यासाठी मदत करते जे समुपदेशनाच्या सहाय्याने निदान आणि योग्य उपचारांसाठी पाठबळ देऊ शकतात.

Please Select Your Preferred Language