अस्थमा

तुमच्या स्थितीवर नियंत्रण ठेवा

होय, अस्थमा ही एक समस्या आहे. परंतु, योग्य उपचार आणि अस्थमा कृती योजना, याद्वारे तुम्ही तुमच्या अस्थमावर संपूर्ण नियंत्रण ठेवू शकता, आणि तुम्हाला तो आहे हे जवळजवळ विसरून जाऊ शकता. तुमचे ट्रिगर्स टाळा प्रत्येक व्यक्तीचा अस्थमा वेगळा असतो आणि त्याचप्रमाणे त्याचे ट्रिगर्स देखील वेगळे असतात. तुमच्या समस्येवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी, तुम्ही तुमचे ट्रिगर्स निश्चित करणे आणि तुम्हाला शक्य होईल तितके ते टाळणे महत्त्वाचे असते.

नियमित औषधोपचार

तुमचे डॉक्टर साधारणपणे तुम्हाला दोन प्रकारची औषधे देतील - जलद आराम देणारे (रिलिवर किंवा बचाव) आणि दीर्घकालीन (नियंत्रण ठेवणारे). जलद आराम देणारी औषधे तात्काळ आराम देतात तर दीर्घ मुदतीची औषधे लक्षणे आणि झटका येण्यास प्रतिबंध करतात. तुमचा अस्थमा पूर्णपणे नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही लिहून दिल्याप्रमाणे ही औषधे घेणे महत्त्वाचे आहे. बचाव आणि नियंत्रक ही दोन्ही औषधे इन्हेलर्सद्वारा घेतली जातात, जे अस्थमाच्या उपचारांमध्ये प्रमुख भूमिका बजावतात.

पीक फ्लो मीटरचा उपयोग करणे

पीक फ्लो मीटर हे लहान उपकरण असते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या अस्थमावर देखरेख ठेवण्यास मदत होते. त्याद्वारे तुम्ही तुमच्या फुफ्फुसांमधून किती जोरात हवा बाहेर सोडू शकता याचा हिशोब करून तुमच्या फुफ्फुसांच्या ताकदीचे मोजमाप केले जाते. तुमच्या डॉक्टरांच्या मदतीने, तुमच्या फुफ्फुसांसाठी तुम्ही उद्दिष्ट निश्चित करू शकता आणि तुमच्या प्रगतीचे नियमित मोजमाप करू शकता. तुमच्या अस्थमावर नियंत्रण ठेवण्यासाठी पीक फ्लो मीटरचा प्रभावीपणे उपयोग कसा करावा हे शिकण्यासाठी ब्रीदफ्री क्लिनिकला भेट द्या.

अस्थमा कृती योजना

अस्थमा कृती योजना ही एक लेखी योजना असते जी तुमच्या अस्थमावर नियंत्रण ठेवस मदत होण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या मदतीने तयार करता. अस्थमा कृती योजना रोजच्या पद्धतीने तुमच्या अस्थमावर नियंत्रण कसे ठेवायचे हे दाखविते, जसे की कोणत्या प्रकारची औषधे घ्यावीत आणि ती कधी घ्यावीत. ह्या योजनेत तुम्हाला कोणती औषधे घ्यावीत आणि तुमच्या अस्थमाच्या लक्षणांमध्ये वाढ झाल्यास आणि अस्थमाचा झटका आल्यास कोणत्या उपाययोजनांचे पालन करावे हे सांगितले जाते. डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा किंवा जवळच्या रूग्णालयात केव्हा जावे हे ह्या योजनेत स्पष्ट करून सांगितले जाते.

डॉक्टरांच्या नियमित भेटी

तुमची लक्षणे नियंत्रणात असली किंवा नसली तरी तुमच्या डॉक्टरांची नियमित भेट घेणे महत्त्वाचे असते. तुमची लक्षणे, अस्थमाचे औषधोपचार आणि तुम्ही घेत असलेल्या इतर औषधांविषयी नेहमी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. अशा प्रकारे तुमचे डॉक्टर एक प्रभावी अस्थमा कृती योजना तयार करू शकतील जी तुमच्या अस्थमावर नियंत्रण ठेवणे, झटक्यास प्रतिबंध करणे आणि परिपूर्ण जीवन जगणे यासाठी उपयुक्त असेल.

Please Select Your Preferred Language