ऍलर्जीक राहिनाइटिस

उपचार

तुम्हाला जितके शक्य होईल तितके तुमचे अॅलर्जेन्स टाळण्याचा प्रयत्न करणे हा अॅलर्जिक र्हनिटससाठीचा सर्वोत्कृष्ठ उपचार.

अॅलर्जेन्स कसे टाळावेत

बाह्य वातावरणातील अॅलर्जेन्सशी संपर्कात येणे टाळण्यासाठी, तुम्ही उदाहरणार्थ खालील खबरदारी घेऊ शकताः

पोलनच्या हंगामा दरम्यान, सकाळी मध्यंतरी आणि संध्याकाळी लवकर यादरम्यान किंवा जेव्हा बाहेर हवा सुटलेली असते तेव्हा घरात रहा कारण ह्या कालावधी दरम्यान हवेत पोलची संख्या सामान्यपणे अधिक असते.

बागकाम करत असताना किंवा धुळीच्या ठिकाणी जाताना मास्क परिधान करा.

कपडे आणि टॉवेल्स बाहेर सुकण्यास घालण्याचा प्रयत्न करू नका, कारण पोलन आणि धूळ त्यावर चिकटू शकते.

तुम्ही जेव्हा बाहेर असता तेव्हा, तुमचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी चष्मा/सनग्लासेस घाला आणि डोळे चोळणे टाळा तसे केल्यास डोळ्यांचा क्षोभ होऊन तुमच्या लक्षणांची स्थिती अधिक खराब होऊ शकते.

घरातील अॅलर्जेन्सशी संपर्क टाळण्यासाठी, तुम्ही उदाहरणार्थ, खालील खबरदारी घेऊ शकताः

खिडक्या बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.

कोरड्या फडक्याने झटका मारणे किंवा झाडू मारण्याऐवजी ओल्या फडक्याने किंवा मॉपने जमिन स्वच्छ करा.

मोल्डस (फंगस) कोणतेही असल्यास, त्याचे पट्टे काढून टाकण्यासाठी भींती नियमितपणे पुसून काढा.

तुमची ब्लँकेटस, उशांची कव्हर्स आणि बेडशिटस गरम पाण्यात, मधूनमधून धुवा.

कारपेट आणि पडदे वेळोवेळी स्वच्छ करा.

तुमचा धुळीच्या कणांशी संपर्क येणे कमी करण्यासाठी तुमच्या सर्व बेडिंग्ससाठी-उशा, गादी, कंफर्टर्स वगैरेसाठी माईट-प्रुफ कव्हर्स वापर करा.

तुमच्या घरातील आर्द्रतेची पातळी शक्य होईल तितकी कमी ठेवा (तुम्ही डि-ह्युमिडिफायरचा उपयोग करू शकता), त्यामुळे फंगस तयार होऊ शकणार नाही.

बाथरूम्स, किचन्स, माळा आणि बेसमेन्टस यांसारख्या जागा नियमितपणे स्वच्छ करा.

तुमच्या कारमधील आणि घरातील वातानुकूलित युनिट स्वच्छ असल्याची खातरजमा करा.

तुम्हाला पाळीव प्राण्यांची अॅलर्जी असल्यास, ह्या गोष्टी लक्षात ठेवाः

कोणत्याही पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर ताबडतोब तुमचे हात स्वच्छ धुवा.

ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत अशा मित्रांना भेटून आल्यानंतर तुमचे कपडे स्वच्छ धुवा.

तुमच्या घरातील पाळीव प्राणी घराबाहेर ठेवा.

 

औषधोपचार

तुम्ही तुमच्या अॅलर्जिक र्हनिटसवर उपचार करण्यास मदत होण्यासाठी वेगवेगळ्या औषधोपचारांचा देखील उपयोग करू शकता. तुमच्या लक्षणांची तीव्रता आणि प्रकारानुसार, तुमचे डॉक्टर नाकातील स्प्रेज, गोळ्या, डोळ्यातील ड्रॉप्स,सिरप्स आणि अगदी इम्युनोथेरपी किंवा तुमची अॅलर्जी अतिशय तीव्र असल्यास अॅलर्जीसाठी इंजेक्शन्स (शॉट्स) यासारख औषधोपचार लिहून देण्याची शक्यता आहे.

संपूर्ण जगात, अॅलर्जिक र्हनिटसवर उपचार करण्यासाठी नाकातील स्प्रेजचा परिणामकारक मार्ग म्हणून मोठ्या प्रमाणात स्वीकार केला आहे.

नाकातील स्प्रेज थेट समस्या असलेल्या ठिकाणी औषध सोडतो म्हणजे नाकात. हे औषध थेट नाकात पोहोचत असल्यामुळे, त्याचा डोस खूप कमी असतो, ज्याचा अर्थ नाकातील स्प्रेजमध्ये खूप कमी दुष्परिणाम असतात. तुम्ही तुमच्या अॅलर्जिक र्हनिटसवर उपचार करणे महत्त्वाचे असते कारण त्यावर वेळेवर उपचार केल्यास, त्यामुळे कानातील संसर्ग, सायनसायटिस आणि नाकातील पॉलिप्स यासारख्या किचकट समस्या होऊ शकतात.

Please Select Your Preferred Language