प्रेरणा

अस्थमाला झटकून टाका

‘‘मी त्याचे नाव वरूण ठेवले. ’’ त्याने वार्‍याप्रमाणे मुक्त असावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती.  पण तो काही महिन्यांचा होता तेव्हा काही तरी असे घडले ज्यासाठी आम्ही तयार नव्हतो.

वरूणला श्वासाचा त्रास होऊ लागला. आम्ही अनेक डॉक्टरांकडे गेलो. सतत औषधे आणि इंजेक्शन्स हा जणू आयुष्याचाच भाग बनले होते.  अनेक वर्ष रात्रीची झोप लागत नव्हती.

तो खूप लहान होता, आणि नाजूक होता. मला खूप भीती वाटत होती. कसे, कोठे, कधी यासारखे प्रश्न निरर्थक बनले होते. पण त्याने आशा सोडली नाही. त्याने ताय-कॉन-डो शिकण्यास सुरूवात केली.मीत्याला प्रोत्साहन दिले आणि त्याला काही तरी झाले आहे असे वाटणार नाही याची काळजी घेतली.

एकदिवस, वरूण घरी आला तेव्हा संपूर्ण हताश झाला होता. तो फक्त ८ वर्षांचा होता. आणि तो ताय-कॉन-डो च्या फायनल्सपर्यंत पोहोचला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो कसा हरला हे तो मला सांगत होता. कारण त्याला श्वासच घेता येत नव्हता.

मी त्याच्या वडिलांशी बोललो. आम्ही वरूणचे जीवन पूर्ववत व्हावे यासाठी त्याला जगातले सर्वोत्कृष्ट उपचार देण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याला एका स्पेशालिस्टकडे घेऊन गेलो त्यांनी आम्हाला सांगितले की वरूणला अस्थमा आहे.

काय करावे आम्हाला सुचत नव्हते. आमच्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीला आश्चर्य वाटत होते की वरूणला असे कसे झाले. हा आजार फक्त मोठ्या माणसांना होतो. आणि इन्हेलर्सचा आमच्या डोक्यात विचारच आला नाही. शेवटी आमच्यासमोर ह्याविषयी खूप प्रश्न होते, आणि काही उत्तर मिळते का हे पाहण्यासाठी आमच्या जवळच्या व्यक्ती आणि शेजारी यांच्याशी आम्ही चर्चा केली. आम्ही भरपूर फिरलो आणि शेवटी आम्हाला एक माहिती मिळाली की इन्हेलर्समुळे मुलांची वाढ खुंटते. वरूणची सामान्य मुलांसारखी वाढ होणार नाही.

आम्ही पूर्णपणे निराश झालो. आम्ही खूप घाबरलो आणि वरूणच्या अस्थमासाठी काही दुसरे उपाय आहेत का हे पाहण्यासाठी आम्ही डॉक्टरांची भेट घेतली.  पण आम्हाला डॉक्टरांनी सांगितले की यात चिंता करण्यासारखे काहीच नाही.  आम्ही इन्हेलेशनचे उपचार सुरू केले. आणि हळूहळू पण निश्चितपणे आम्हाला परिणाम दिसू लागले.

वरूण ताय-कॉन-डो मध्ये दिवसेंदिवस प्रगती करू लागला होता. इन्हेलरचे उपचार आणि त्याच्या आरोग्याला पूरक सवयी यामुळे त्याला प्रत्येक टप्यावर फायदा होऊ लागला आणि अस्थमा त्याला रोखू शकला नाही.

आज, कोणाचाही विश्वास बसणार नाही की वरूणला अस्थमा आहे पण आज त्याने अनेक पदके आपल्या छातीवर अभिमानाने झळकवली आहेत.

Please Select Your Preferred Language