पुढाकार

ब्रीदफ्री फेस्टिवल

देशातील एक सर्वाधिक मोठा रूग्ण प्रशिक्षण उपक्रम, ब्रीदफ्रीचा उद्देश श्वसनाच्या समस्या आणि त्यांचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी जाणीवजागृती निर्माण करणे आणि त्याचा प्रसार करणे हा आहे. त्या दृष्टीकोनातून, ब्रीदफ्रीमध्ये आम्ही गेले काही वर्ष लोकांना त्यांच्या फुफ्फुसाच्या आरोग्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी विविध शिबीरांचे आणि इतर उपक्रमांचे आयोजन केले आहे.

देशाच्या प्रत्येक भागात ब्रीदफ्री नेण्याची आणि ज्यांना समस्या असूनही त्यांना त्याची माहिती नाही अशा लोकांना निदान करण्यासाठी आणि उपचार देण्यासाठी मदत म्हणून आवश्यक वैद्यकीय पायाभूत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही ब्रीदफ्री फेस्टिवलचे आयोजन केले.

ब्रीदफ्री फेस्टिवल ही ब्रीदफ्री परिवारासाठी आवश्यक मोहीम आहे कारण त्याद्वारे अस्थमा, इन्हेलेशनचे उपचार ह्याविषयी असलेले सर्व गैरसमज दूर केले जाण्यासाठी कार्य करते, आणि कोणतीही भीती न बाळगता लोकांना त्याचा स्वीकार करण्यास मदत केली जाते. इन्हेलेशन उपचारपद्धतीच्या विविध पैलूंविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि ती समजावून सांगण्यासाठी, आम्ही ब्रीदफ्री चाचणी यात्रा आणि ब्रीदफ्री केमिस्ट्स यासारखे व्यासपीठ निर्माण केले.

विविध स्पेशियालिटीजमधील ३०० हून अधिक डॉक्टरांच्या सहकार्याने संपूर्ण देशातील सुमारे ४०० पेक्षा अधिक ठिकाणी निदान न करण्यात आलेल्या सुमारे १००,००० लोकांपर्यंत ब्रीदफ्री यात्रा पोहोचली. सध्या तिसर्‍या वर्षात, असलेला ब्रीदफ्री फेस्टिवल श्वसनाच्या समस्यांविषयी जाणीव जागृती निर्माण करणारे विविध संघ आणि त्यांचे श्रोते यांच्यामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.

FB Live Interview with Dr. Jaideep Gogtay

Read More

#SaveyourlungsDilli

Read More

जागतिक अस्थमा महिना - २ मे, २०१७

Read More

Please Select Your Preferred Language