Home
  Breathe Free
हा खोकला आहे
की दमा?
उपचार आणि
नियंत्रण
दम्याविषयी आपल्या प्रश्नांना उत्तरे
ऍलर्जिक
राहिनाइटिस
सिओपीडी

आपला दमा मोजा

दम्याचे निदान कसे केले जाते?  

आपण किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीस दमा असल्याचे निदान झाले, तर काळजी करण्याचे नक्कीच कारण नाही. भीती वाटण्याची किंवा आपली नोकरी किंवा शहर बदलण्याची गरज नाही. ऑलिम्पिक ऍथेलिट्सला दमा असतो, मोठ्या क्रिकेटपटूस दमा असतो, कलाकारास दमा असतो, राजकारण्यास दमा असतो, परंतु तरीही यामुळे त्यांच्या सामान्य जीवनावर याचा परिणाम होत नाही.

आपला दमा नियंत्रित करण्याची गुरुकिल्ली म्हणजे आपले ट्रिगर्स (उद्दीपके) समजून घेणे, यासाठी पाहा आपली लक्षणं आणि आपले औषध योग्य रितीने घेणे. परंतु प्रथम याचे निदान योग्य होणे आवश्यक आहे.

भारतातल्या, आपल्या मुलांना दमा आहे हे अनेक पालक स्वीकारण्यास तयार नाहीत. ते आपल्या मुलाला दमा’ या शब्दाऐवजी व्हिझिंग ब्राँकायटिस’ किंवा ऍलर्जीक ब्राँकायटिस’ आहे असे ऐकायला उत्सुक असतात. ते मुलांसाठी दगदग करून या डॉक्टरांकडून त्या डॉक्टरांकडे जातात आणि स्वतःचा ताण वाढवून घेतात, प्रत्यक्ष दम्याचे लवकर निदान झाल्यास आणि वेळेत उपचार झाल्यास, त्यांचा मुलगा एक सामान्य, जलद जीवन जगू शकतो. मुलांना मुलंच राहू द्यावे आणि दमा असलेल्या मुलावर योग्य उपचार झाल्यास तो सुद्धा सामान्य मुलाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करू शकतो – शाळेत नियमित जाऊ शकतो, खेळ खेळू शकतो आणि होय, अगदी आईस्क्रीम सुद्धा खाऊ शकतो! (रुग्णाच्या फिल्मसाठी येथे क्लिक करा)

दमा सापडणे सोपे आहे परंतु काहीवेळा त्याच्याकडे चुकून खोकला म्हणून पाहिले जाते आणि अशा प्रकारे गांभीर्याने घेतले जात नाही किंवा वेळेत उपचार होत नाहीत किंवा कफ सिरपने उपचार केले जातात. सुरवातीला,दमा पिढ्यांमध्ये होतो. आपल्या डॉक्टरांना आपला किंवा आपल्या मुलाच्या दम्याचे निदान करण्यास मदत करण्यासाठी आपल्याला डॉक्टरांच्या प्रश्नांचे शक्य तितके अचूक उत्तर द्यावे लागेल. प्रश्न आपल्या लक्षणं, आपला कौटुंबिक इतिहास, आपण घेत असलेली औषधं, आपल्याला असलेली ऍलर्जी आणि अशा गोष्टींशी संबंधित असतात. याला वैद्यकीय इतिहास म्हटले जाते. अनेक निदाने वैद्यकीय इतिहासावर आधारित असतात. डॉक्टर एक शारिरीक तपासणी सुद्धा घेतील आणि आपल्याला पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर)आणि स्पायरोमेट्री चाचणी सारख्या काही तपासण्या करून घेण्यास सांगतील.

दम्याचे निदान झाल्यास तो नियंत्रित करण्यासाठी आपल्याला योग्य उपचार सुरू करावे लागतील. आपला दमा नियंत्रित करण्याचा महत्वाचा भाग म्हणजे आपल्या दम्यावर लक्ष ठेवले जाईल,म्हणजेच आपण आपला दमा वाढत आहे किंवा तो आणखी बिघडत आहे यावर लक्ष ठेवणे. यामुळे आपल्या डॉक्टरांना त्यांनी कोणती औषधं लिहून द्यावीत आणि आवश्यक असल्यास, डोस केव्हा बदलावा हे ठरविण्यात मदत होईल. अधिक माहितीसाठी, हे वाचा









पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर)  

पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर)हे एक साधे, स्वस्त, हाताने हाताळण्यासारखे मशीन असून हे श्वासोच्छ्वास समस्यांचे निदान करण्यास आणि मुले आणि प्रौढांमधील दम्याचे निदान करण्यात मदत करते. हे आपण दम्याचे उपचार घेत असता तेव्हा आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी इन्स्ट्रूमेंट म्हणून देखील वापरले जाते.

जसे आपल्याकडे रक्त दाब तपासण्यासाठी BP इन्स्ट्रूमेंट आणि मधुमेह तपासण्यासाठी ग्लूकोमीटर असते,पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर)दम्यासाठी थर्मामीटर सारखेच आहे. रुग्ण म्हणून, आपण मशीनच्या माउथपीसमध्ये फुंकर मारावी, म्हणजे आपल्या फुप्फुसांची क्षमता तपासण्यासाठी रिडिंग घेतले जाईल. बर्या्च डॉक्टरांकडे त्यांच्या क्लिनिकमध्ये मशीन असते परंतु आपण आपला दमा स्वतःच तपासण्यास इच्छुक असल्यास, ते मोठ्या मेडिकलमध्ये देखील उपलब्ध असते.


आपल्याला दमा असल्यास आपण पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर) आपली प्रगतीमध्ये सुधारणा होते आहे किंवा नाही हे मोजण्यासाठी वापरू शकता. आपले डॉक्टर आपल्याला पीक फ्लो मीटरवरील (ब्रीदोमीटर) कोणती संख्या किंवा रिडिंग चांगले किंवा आपल्यासाठी सामान्य आहे ते आपले वय आणि उंचीनुसार सांगू शकतील. जर रिडिंगमध्ये ड्रॉप असल्यास, याचा अर्थ असा की आपला दमा चांगला नियंत्रित नाही आणि आपल्याला कदाचित भविष्यात किंवा लवकरच अॅयटॅक येईल. हा डोस वाढविण्याच्या अलिकडील चेतावणी सिग्नलप्रमाणे आहे किंवा तितक्या वेळा आपण आपले औषध घ्यायचे आहे. संख्या आपल्या मागील रिडिंगपेक्षा मोठी असल्यास, याचा अर्थ आपला दमा नियंत्रित आहे आणि आपल्यात सुधारणा होत आहे. जेव्हा पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर) रिडिंग सामान्य आहे (अंक आपले डॉक्टर आपल्याला सांगतील), तो असे सुचवितो की आपला दमा नियंत्रणात आहे..









स्पायरोमेट्री तपासणी  

स्पायरोमेट्री तपासणी ही एक जास्त संवेदनशील आणि अत्याधुनिक तपासणी असून यात त्वरीत दम्याची लक्षणं दिसून येतात. स्पायरोमीटर आपल्या मुलाची फुप्फुसे किती हवा धरून ठेवू शकते आणि फुप्फुसांबाहेर हवा किती कार्यक्षमतेने येते हे मोजण्यासाठी वापरले जाते. दुसर्याम शब्दात, हे आपल्याला आपल्या फुप्फुसांच्या क्षमतेबद्दल चांगली सूचना देते आणि आपल्या श्वासोच्छ्वासाच्या क्षमतेबद्दल अचूक तपशील सांगते. तपासणी करणारी लॅब किंवा डॉक्टर आपल्याला आपल्या रिडिंगचा एक छापील ग्राफ देते, आपल्याला आपल्या ECG तपासणीचा जसा ग्राफ आपल्याला मिळतो अगदी तसाच.

दोन्ही पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर) आणि स्पायरोमेट्री या तपासण्या दम्याचे निदान करण्यासाठी वापरल्या जातात आणि आपला दमा नियंत्रित असताना आपली प्रगती मोजण्यासाठी देखील यामुळे आपल्याला मदत होते.

तथापि, या तपासण्या सहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सूचविलेल्या नाहीत, आपण एक पालक म्हणून आपल्या बालरोगतज्ज्ञांबरोबर एकत्र काम करावे, हे निश्चित करण्यासाठी की आपल्या मुलाच्या दम्याचे निदान लवकर आणि अचूक व्हावे म्हणून, आपल्या कुटुंबाच्या इतिहासाकडे आणि ट्रिगर्स (उद्दीपके) कडे लक्ष देऊन. आपल्याला आपल्या डॉक्टरांकडे नियमित जाणे देखील आवश्यक आहे म्हणजे आपण दोघे आपल्या मुलाच्या प्रगतीवर एकत्र लक्ष ठेवू शकाल.




 
पीक फ़्लो मीटर (ब्रीदोमीटर)   
पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर)हे एक साधे, स्वस्त, हाताने हाताळण्यासारखे मशीन असून हे श्वासोच्छ्वास समस्यांचे निदान करण्यास आणि मुले आणि प्रौढांमधील दम्याचे निदान करण्यात मदत करते.
 
स्पाइरोमीटरी जाँच   
स्पायरोमेट्री तपासणी ही एक जास्त संवेदनशील आणि अत्याधुनिक तपासणी असून यात त्वरीत दम्याची लक्षणं दिसून येतात.