दम्याच्या बाबतीत जागरूकता वाढविण्याच्या हेतूने, 24 आणि 25 फेब्रुवारी ला टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई च्या कर्मचार्यांसाठी 'फुफ्फुसांचा तपासणी कॅम्प' आयोजित केला गेला होता. कर्मचार्यांाना फुफ्फुसाच्या स्वास्थ्याचे महत्व सांगणारे ईमेल पाठविण्यात आले होते.
कॅम्पसाठी 230 ऑनलाइन नोंदण्यांसह जबरदस्त प्रतिसाद मिळाला. इव्हेंटच्या 2 दिवसांपूर्वी ब्रीद फ्री (Breathe Free) स्टॅन्डीज आणि पोस्टर टाइम्सच्या परिसरात लावले गेले होते.
मोठ्या प्रमाणावर लोक येण्याच्या अपेक्षेने, आम्ही 4 स्क्रीनिंग डेस्क, प्रत्येक पीक फ्लो मीटरसह आणि त्यांच्या फुफ्फुसांची चाचणी आणि रीडिंग जाणून घेण्यात मदतीसाठी आमचे प्रतिनिधी नियुक्त केले. कर्मचार्यां्ना बसण्याच्या सोयीसह 2 डॉक्टरांसाठी वेगवेळ्या कक्षांची सोय केली होती. तेथे मशीनच्या डेमो आणि स्पायरोमीटरी तपासण्यासाठी देखील काउंटर होते.
जसेच घड्याळीत 11 वाजले, काउंटरवर कर्मचारी येऊ लागले. त्या सगळ्यांची पीक-फ्लो मीटरवर तपासणी केली गेली आणि त्यापैकी काही लोकांना फिजीशियन ने तपासले आणि पुढे स्पायरोमीटरी तपासणी पाठवले. आम्ही या गोष्टीची काळजी घेतली की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या फुफ्फुसांच्या स्थितीच्या आधारावर योग्य लक्ष आणि वेळ दिली जावी. डॉक्टरांनी कर्मचार्यांाच्या आवश्यकतेप्रमाणे निदान, मार्गदर्शन आणि उपचार देखील सांगितले.
दोन दिवसाच्या कॅम्पमध्ये एकूण 500 पेक्षा अधिक कर्मचार्यांानी भाग घेतला.
शिबीर निम्नलिखित डॉक्टरांच्या मदतीने यशस्वी झाला ज्यांनी आमच्या ब्रीद फ्री (BreatheFree) आंदोलनाच्या समर्थनासाठी मदतीचा हात दिला. ब्रीद फ्री (BreatheFree) वर विश्वास ठेवल्याबद्दल आणि जागरूकता वाढविण्यासाठी आमच्या या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.
1 ला दिवस म्हणजे 24 फेब्रुवारी, 2010
• डॉ. राजरतन सदावर्ते - चेस्ट फिजीशियन, मालाड
• डॉ. रोहित हेगडे (चेस्ट पीजी-जीटी हॉस्पिटल)
• डॉ. आनंद कुमार - चेस्ट फिजीशियन, मुलंड
2 रा दिवस म्हणजे 25 फेब्रुवारी, 2010
• डॉ. विवेक सिंह - चेस्ट फिशियन, वाशी
• डॉ. विद्या दोशी – चेस्ट फिशियन, भाटिया हॉस्पिटल
आम्ही टाइम्स ऑफ इंडिया चे श्री चंद्रशेखर मुखर्जी, श्री सुजॉय मजुमदार आणि श्री दीपक कुमार यांना देखील धन्यवाद देतो ज्यांनी आम्हाला त्यांच्या कर्मचार्यां्पर्यंत पोहोचण्यासाठी मंच दिला.
जर आपण कोणत्याही कॉर्पोरेट, शाळा, सोसायटी किंवा समुदायाला ओळखता जे त्यांच्या परिसरात असा फुफ्फुसांचा तपासणी कॅम्प आयोजित करू इच्छित असतील तर कृपया आम्हाला
info@breathefree.com येथे लिहा.