Home
  Breathe Free
हा खोकला आहे
की दमा?
उपचार आणि
नियंत्रण
दम्याविषयी आपल्या प्रश्नांना उत्तरे
ऍलर्जिक
राहिनाइटिस
सिओपीडी

ईवेंट और जागरूकता

अस्थमा सावधान शाळा

 
शाळेत निर्माण होणारी अस्थमाची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शिक्षक आणि शाळेचे अधिकारी ह्यांना सक्षम करण्यासाठी ब्रीद फ्री ह्या सिपलाच्या सार्वजनिक सेवा कार्यक्रमाअंतर्गत कोलकत्त्यामध्ये 17 सप्टेंबर 2010 रोजी ‘अस्थमा सावधान शाळा’ ही मोहीम राबविण्यात आली.

अस्थमाच्या अटॅकच्या दरम्यान प्रथमोपचाराची औषधे वापरणे आणि मुलांमधील अस्थमाची लक्षणे ओळखून ती पालकांना परिणामकारकतेने सांगणे ह्याचे शिक्षकांना प्रशिक्षण देणारा भारतातील हा पहिला कार्यक्रम आहे.

सॉल्ट लेक येथील कोलंबिया एशिया हॉस्पिटल अँड शिशु संजीवन हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ सल्लागार डॉ.सुभासिस रॉय आणि सॉल्ट लेक येथील कोलंबिया एशिया हॉस्पिटल अँड एएमआरआय हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ सल्लागार डॉ.पल्लव चॅटर्जी ह्यांनी भारतामध्ये ‘अस्थमा सावधान शाळा’ ही संकल्पना वास्तवात आणण्याची गरज पत्रकारांना सांगितली.

ह्या कार्यक्रमामुळे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अस्थमा असलेल्या मुलांची काळजी घेण्यासाठी शाळेच्या कर्मचा-यांना कसा फायदा होईल ह्याबद्दल पत्रकारांसमोर आपले विचार मांडल्याबद्दल टॉलीगंज येथील असेंब्ली ऑफ गॉड चर्चच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. एम. नॉर्मन आणि आंध्र असोसिएशन स्कूलच्या माननीय मुख्याध्यापिका सौ.लीना हराथी ह्यांचे आम्ही आभारी आहोत.

कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि 40 शाळांमधील 185 शिक्षक त्यामध्ये सहभागी झाले. डॉक्टरांकडून अस्थमाबद्दल जाणून घेण्यासाठी ‘अस्थमा सावधान शाळा’ मोहीमेतील पहिली कार्यशाळा हे शिक्षकांसाठी चांगले व्यासपीठ ठरले.

कोलकत्त्यामधील अनेक शाळांमध्ये हा कार्यक्रम पोहोचविण्यास आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही प्रकाशक आणि दूरदर्शन वाहिन्यांचे आभारी आहोत. तुमची शाळा ‘अस्थमा सावधान शाळा’ पैकी एक असावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आम्हाला वर विनंती पाठवू शकता http://www.breathefree.com/Asthma_Alert_Schools.html
 
 

  चित्र गॅलरी