|
खोकला आणि दमा दोन भिन्न गोष्टी आहेत. तरीही दमा असलेल्या लोकांना श्वा स घेण्यास त्रास होतो आणि सहसा खूप खोकला येतो. जर आपण किंवा आपले मुल खोकला थांबविण्यासाठी नियमितपणे एखादे खोकल्याचे औषध घेत असाल तर वास्तविक समस्या काहीतरी वेगळीच असू शकते. वास्तविकत: सततचा खोकला दम्याचे लक्षण असू शकते. जरी आपल्याला किंवा आपल्या लाडक्यास दमा असला तरीही सर्व काही संपल असे नाही कारण तो नियंत्रित केला जाऊ शकतो आणि आपण देखील त्या लाखो लोकांप्रमाणे एक सामान्य, सक्रीय जीवन जगू शकता ज्यांना दमा आहे.
आपल्याला आयुष्यात कधी ना कधी खोकला झालाच असेल. परंतू आपल्याला आपल्याला खोकला का होतो आणि हे काय आहे हे नक्की माहिती नसते. सोप्या भाषेत सांगायचे तर खोकला हा आपल्या फुफ्फुसातून हानीकारक कणांना दूर करण्याची शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. हे कण साधारणपणे धूळ, व्हायरस, बॅक्टेरिया किंवा स्त्राव असतात.
जर आपल्याला खूप जास्त आणि सतत खोकला होत असेल तर हा आपल्या फुफ्फुसांमध्ये समस्या असल्याचा संकेत असू शकतो.
जर आपण आपल्या खोकल्यासाठी कफ सिरप्स घेत असाल तर कृपया लक्षात ठेवा की बर्यााच कफ सिरप्समध्ये हानीकारक उत्तेजक असतात जे आपल्याला तात्पुरता आराम देऊ शकतात आणि फुफ्फुसाची समस्या लपवू शकतात. म्हणून जर आपला खोकला सतत चालू राहत असेल तर कृपया उशीर न करता आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. खोकल्याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
दमा एक अशी स्थिती आहे जी आपल्या फुफ्फुसातील वातनलिका अर्थात त्या नलिका ज्या आपल्या फुफ्फुसांमधील हवा आता बाहेर नेतात त्यांना प्रभावित करते. [व्हिडिओ पाहा] दम्यामध्ये वातनलिकेच्या अवतीभवतीचे स्नायु घट्ट होतात आणि अरुंद होतात. यामुळे श्वाघस घेण्यास त्रास होतो. यामुळे आपल्या वातनलिकांमध्ये जळजळ (सूज) देखील होते आणि काहीवेळा चिकट पदार्थ किंवा कफ तयार होतो आणि वातनलिकांना अवरोधित करुन श्वाआस घेण्यात त्रासदायक ठरतो. सहसा, श्वासाची घरघर ऐकू येते. दम्यामध्ये आपल्या वातनलिका अतिसंवेदनशील होतात आणि बर्याAच उत्तेजक पदार्थांच्या विरुद्ध प्रतिक्रिया करतात ज्यांना ट्रिगर्स म्हंटले जाते, जसे की सिगरेटचा धूर, परागकण किंवा थंड हवा.
आता जर आपल्या स्वत:ला दमा आहे किंवा आपण अशा एखाद्या व्यक्तीला ओळखता ज्याला दमा आहे तर आपण सर्व प्रथम हे करावे: काळजी करु नका. आपण एकटे नाही आहात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन (WHO) नुसार, जवळपास 300 लाख लोक सध्या दम्याचे रुग्ण आहेत.. दमा हा मुलांना होणारा सर्वात क्रॉनिक (दीर्घकाळ राहणारा) आजार आहे. WHO जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दम्याचे प्रभावित 25-30 लाख लोक केवळ एकट्या भारतातच आहेत.
आधी जेथे दम्याच्या बाबतीत बर्याुच भ्रामक कल्पना जुळलेल्या होत्या, आज आजाराविषयी अधिक माहिती आणि आधुनिक औषधीमुळे दमा असल्यावर देखील आपण एक सामान्य, सक्रीय जीवन जगू शकता. चित्रपट कलाकारांना दमा आहे, क्रिकेटपटूंना दमा आहे, प्रमुख व्यावसायिकांना देखील दमा आहे आणि त्यांनी यास त्यांच्या यशात अडथळा बनू दिले नाही. त्यामुळे आपण आपल्या किंवा आपल्या लाडक्यास जीवनाचा आनंद उपभोगण्यात दम्यास अडचण बनू देण्याचे काहीही कारण नाही.
दम्याची सामान्य लक्षणे अशी आहेत:
 |
छातीतील घट्टपणा: छातीत दाबल्यासारखे वाटणे, कोणीतरी ती दाबत असल्यासारखे किंवा त्यावर बसल्यासारखे वाटणे. दमा म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा |
 |
श्वास लागणे: धाप लागणे म्हणजे अशी स्थिती ज्यात आपल्या फुफ्फुसांना आत आणि बाहेर पुरेशी हवा मिळत नाही. विशेषतः श्वास सोडणे कठीण जाते.दमा म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा |
 |
वारंवार येणारा किंवा सतत होणारा खोकला: असा खोकला जो जात नाही. असा खोकला जो सहसा रात्री किंवा व्यायाम केल्यानंतर येतो. हा खोकला आहे की दमा? हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा |
 |
श्वाकसाची घरघर: एक शिट्टीसारखा आवाज जो श्वा स बाहेर सोडताना ऐकू येतो. |
इतर लक्षणे:
 |
रात्रीच्या खोकल्यामुळे झोपमोड होणे |
 |
|
कृपया लक्षात घ्याः दम्याची लक्षणे वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळी असतात. काहींमध्ये सर्व लक्षणं दिसतात तर इतरांमध्ये फक्त खोकला किंवा घरघर असू शकते. आपल्या लक्षणांवर चांगले लक्ष ठेवा आणि आपल्या स्थितीचे निदान करण्यात मदतीसाठी आपल्या डॉक्टरांशी त्यांच्याविषयी चर्चा करा. आणि लक्षात ठेवा की योग्य उपचारांनी आपल्या दम्याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेऊ शकता.
दम्याचे निदान कसे केले जाते?
आपण किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीस दमा असल्याचे निदान झाले, तर काळजी करण्याचे नक्कीच कारण नाही. भीती वाटण्याची किंवा आपली नोकरी किंवा शहर बदलण्याची गरज नाही. ऑलिम्पिक ऍथेलिट्सला दमा असतो, मोठ्या क्रिकेटपटूस दमा असतो, कलाकारास दमा असतो, राजकारण्यास दमा असतो, परंतु तरीही यामुळे त्यांच्या सामान्य जीवनावर याचा परिणाम होत नाही.
आपला दमा नियंत्रित करण्याची गुरुकिल्ली म्हणजे आपले ट्रिगर्स (उद्दीपके) समजून घेणे, यासाठी पाहा आपली लक्षणं आणि आपले औषध योग्य रितीने घेणे. परंतु प्रथम याचे निदान योग्य होणे आवश्यक आहे.
भारतातल्या, आपल्या मुलांना दमा आहे हे अनेक पालक स्वीकारण्यास तयार नाहीत. ते आपल्या मुलाला दमा’ या शब्दाऐवजी व्हिझिंग ब्राँकायटिस’ किंवा ऍलर्जीक ब्राँकायटिस’ आहे असे ऐकायला उत्सुक असतात. ते मुलांसाठी दगदग करून या डॉक्टरांकडून त्या डॉक्टरांकडे जातात आणि स्वतःचा ताण वाढवून घेतात, प्रत्यक्ष दम्याचे लवकर निदान झाल्यास आणि वेळेत उपचार झाल्यास, त्यांचा मुलगा एक सामान्य, जलद जीवन जगू शकतो. मुलांना मुलंच राहू द्यावे आणि दमा असलेल्या मुलावर योग्य उपचार झाल्यास तो सुद्धा सामान्य मुलाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करू शकतो – शाळेत नियमित जाऊ शकतो, खेळ खेळू शकतो आणि होय, अगदी आईस्क्रीम सुद्धा खाऊ शकतो! (रुग्णाच्या फिल्मसाठी येथे क्लिक करा)
दमा सापडणे सोपे आहे परंतु काहीवेळा त्याच्याकडे चुकून खोकला म्हणून पाहिले जाते आणि अशा प्रकारे गांभीर्याने घेतले जात नाही किंवा वेळेत उपचार होत नाहीत किंवा कफ सिरपने उपचार केले जातात. सुरवातीला,दमा पिढ्यांमध्ये होतो. आपल्या डॉक्टरांना आपला किंवा आपल्या मुलाच्या दम्याचे निदान करण्यास मदत करण्यासाठी आपल्याला डॉक्टरांच्या प्रश्नांचे शक्य तितके अचूक उत्तर द्यावे लागेल. प्रश्न आपल्या लक्षणं, आपला कौटुंबिक इतिहास, आपण घेत असलेली औषधं, आपल्याला असलेली ऍलर्जी आणि अशा गोष्टींशी संबंधित असतात. याला वैद्यकीय इतिहास म्हटले जाते. अनेक निदाने वैद्यकीय इतिहासावर आधारित असतात. डॉक्टर एक शारिरीक तपासणी सुद्धा घेतील आणि आपल्याला पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर)आणि स्पायरोमेट्री चाचणी सारख्या काही तपासण्या करून घेण्यास सांगतील.
पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर)
पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर)हे एक साधे, स्वस्त, हाताने हाताळण्यासारखे मशीन असून हे श्वासोच्छ्वास समस्यांचे निदान करण्यास आणि मुले आणि प्रौढांमधील दम्याचे निदान करण्यात मदत करते. हे आपण दम्याचे उपचार घेत असता तेव्हा आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी इन्स्ट्रूमेंट म्हणून देखील वापरले जाते.
जसे आपल्याकडे रक्त दाब तपासण्यासाठी BP इन्स्ट्रूमेंट आणि मधुमेह तपासण्यासाठी ग्लूकोमीटर असते,पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर)दम्यासाठी थर्मामीटर सारखेच आहे. रुग्ण म्हणून, आपण मशीनच्या माउथपीसमध्ये फुंकर मारावी, म्हणजे आपल्या फुप्फुसांची क्षमता तपासण्यासाठी रिडिंग घेतले जाईल. बर्या्च डॉक्टरांकडे त्यांच्या क्लिनिकमध्ये मशीन असते परंतु आपण आपला दमा स्वतःच तपासण्यास इच्छुक असल्यास, ते मोठ्या मेडिकलमध्ये देखील उपलब्ध असते.
आपल्याला दमा असल्यास आपण पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर) आपली प्रगतीमध्ये सुधारणा होते आहे किंवा नाही हे मोजण्यासाठी वापरू शकता. आपले डॉक्टर आपल्याला पीक फ्लो मीटरवरील (ब्रीदोमीटर) कोणती संख्या किंवा रिडिंग चांगले किंवा आपल्यासाठी सामान्य आहे ते आपले वय आणि उंचीनुसार सांगू शकतील. जर रिडिंगमध्ये ड्रॉप असल्यास, याचा अर्थ असा की आपला दमा चांगला नियंत्रित नाही आणि आपल्याला कदाचित भविष्यात किंवा लवकरच अॅयटॅक येईल. हा डोस वाढविण्याच्या अलिकडील चेतावणी सिग्नलप्रमाणे आहे किंवा तितक्या वेळा आपण आपले औषध घ्यायचे आहे. संख्या आपल्या मागील रिडिंगपेक्षा मोठी असल्यास, याचा अर्थ आपला दमा नियंत्रित आहे आणि आपल्यात सुधारणा होत आहे. जेव्हा पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर) रिडिंग सामान्य आहे (अंक आपले डॉक्टर आपल्याला सांगतील), तो असे सुचवितो की आपला दमा नियंत्रणात आहे..
स्पायरोमेट्री तपासणी
स्पायरोमेट्री तपासणी ही एक जास्त संवेदनशील आणि अत्याधुनिक तपासणी असून यात त्वरीत दम्याची लक्षणं दिसून येतात. स्पायरोमीटर आपल्या मुलाची फुप्फुसे किती हवा धरून ठेवू शकते आणि फुप्फुसांबाहेर हवा किती कार्यक्षमतेने येते हे मोजण्यासाठी वापरले जाते. दुसर्याम शब्दात, हे आपल्याला आपल्या फुप्फुसांच्या क्षमतेबद्दल चांगली सूचना देते आणि आपल्या श्वासोच्छ्वासाच्या क्षमतेबद्दल अचूक तपशील सांगते. तपासणी करणारी लॅब किंवा डॉक्टर आपल्याला आपल्या रिडिंगचा एक छापील ग्राफ देते, आपल्याला आपल्या ECG तपासणीचा जसा ग्राफ आपल्याला मिळतो अगदी तसाच.
दोन्ही पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर) आणि स्पायरोमेट्री या तपासण्या दम्याचे निदान करण्यासाठी वापरल्या जातात आणि आपला दमा नियंत्रित असताना आपली प्रगती मोजण्यासाठी देखील यामुळे आपल्याला मदत होते.
तथापि, या तपासण्या सहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सूचविलेल्या नाहीत, आपण एक पालक म्हणून आपल्या बालरोगतज्ज्ञांबरोबर एकत्र काम करावे, हे निश्चित करण्यासाठी की आपल्या मुलाच्या दम्याचे निदान लवकर आणि अचूक व्हावे म्हणून, आपल्या कुटुंबाच्या इतिहासाकडे आणि ट्रिगर्स (उद्दीपके) कडे लक्ष देऊन. आपल्याला आपल्या डॉक्टरांकडे नियमित जाणे देखील आवश्यक आहे म्हणजे आपण दोघे आपल्या मुलाच्या प्रगतीवर एकत्र लक्ष ठेवू शकाल.
दम्याचे ट्रिगर्स (उद्दीपके) आणि त्यांच्यापासून कसा बचाव करायचा: |
ट्रिगर (उद्दीपक) अशी वस्तू आहे जी फुफ्फुसांच्या वातनलिका इरिटेट (उत्तेजित) करते आणि दम्याच्या लक्षणांचे कारण बनते. प्रत्येकाचा दमा भिन्न असतो आणि होऊ शकते की आपल्या दम्याचे कारण एकापेक्षा जास्त ट्रिगर (उद्दीपक) असतील. आपले ट्रिगर (उद्दीपक) धुळीचे कण आणि पाळीव प्राण्यांपासून प्रदुषण आणि परागकणांपर्यत काहीही असू शकते. आपल्याला आपल्या ट्रिगर्स (उद्दीपके) विषयी माहिती असणे महत्वाचे आहे आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करा. कारण दमा नियंत्रित केला जाऊ शकतो आणि आपण एक सामान्य जीवन जगू शकता.
आपले विशिष्ट ट्रिगर (उद्दीपक) ओळखणे कठीण होऊ शकते परंतु काहीवेळा यांचे संकेत स्पष्ट असतात. उदाहरणार्थ: जेव्हा आपली लक्षणे एखाद्या मांजर, कुत्रा किंवा पक्ष्याच्या संपर्कात आल्याच्या काही मिनिटातच प्रारंभ होत असतील. किंवा हवेत फटाक्यांच्या धूराने प्रदुषण झाल्याने आपली लक्षणे सुरु होत असतील. तर संभवत: आपण हवेत मिसळलेल्या एखाद्या वस्तुविषयी एलर्जीक आहे जी आपल्या वातनलिकांना इरिटेट (उत्तेजित) करतात. आणि अॅ्टॅक येण्यास कारणीभूत होते.
दमा विकसित होण्यात सर्वात जास्त धोका वातावरणात असलेल्या घटकापासून असतो जे श्वाउसाद्वारे ओढले जातात आणि एलर्जीक प्रतिक्रियांचे कारण बनतात किंवा वातनलिकांना इरिटेट (उत्तेजित) करतात जसे की घरातील धूळकण, तंबाखूचा धूर, रसायन कार्यस्थानातील उत्तेजित पदार्थ (उदाहरणार्थ कोळसा, सिमेंट, रंग, खनिज पदार्थ, खाणकाम, साखर, कीटकनाशके), वायूप्रदुषण आणि परागकणांसारखे बाह्य एलर्जेन्स. त्या लोकांना देखील अधिक धोका असतो जे गर्दीच्या ठिकाणी, ओलसर भिंतींच्या आत राहतात आणि स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्या लाकडाच्या धूरामध्येण राहतात.
दम्याच्या अॅेटॅक पासून बचावासाठी येथे काही सामान्य ट्रिगर्स (उद्दीपके) आणि उपयोगी सूचना दिल्या आहेत.
 |
घरातील धूळीचे कीटाणु:
धुळीचे कीटाणु सर्वात सामान्य ट्रिगर (उद्दीपक) आहेत. हे ते लहान कीटाणु आहेत जे कारपेट्स, मॅट्रेसेस, सोफे, पडदे आणि हो अगदी सॉफ्ट खेळण्यांमध्ये देखील असतात.
उपयोगी सूचना: शक्य असल्यास कारपेट्सचा वापर करणे टाळा आणि एखाद्याकडून नियमितपणे साफ सफाई करवून घ्या. जर आपल्या स्वत:ला दमा असेल तर दुसर्याc एखाद्याकडून साफसफाई करवून घ्या किंवा आपण घरी नसताना करवून घ्या. जर आपल्या मुलास दमा असेल तर जेव्हा तो शाळेत असेल तेव्हा साफसफाई करा.
अंथरुणावरुन सर्व सॉफ्ट खेळणी दूर करा.
प्रत्येक 2 आठवड्यात सॉफ्ट खेळणी धुवा आणि त्यांना सूर्यप्रकाशात वाळवा.
|
 |
पाळीव प्राणी:
पाळीव प्राणी दम्याच्या लक्षणांपैकी एक सामान्य ट्रिगर (उद्दीपक) आहे. त्यांचे केस, पिसे, लाळ, त्वचेचा थर, किंवा मूत्र दम्याच्या लक्षणांचे कारण बनू शकतात.
उपयोगी सूचना: केसाळ प्राणी आणि पीस असलेले पक्षी पाळणे टाळा. त्यांना आपल्या राहण्याच्या आणि झोपण्याच्या प्रमुख ठिकाणांपासून दूर ठेवा.
आपल्याला पाळीव प्राणी पाळणे आवश्यक असल्यास, त्याऐवजी मासे ठेवा.
|
 |
धुम्रपान आणि वायु प्रदुषण:
बर्याrच वेळा आपण प्रदुषित हवेत श्वा स घेतो जे दम्याची लक्षणे सक्रीय करु शकतात. सिगरेटचा धूर, कारमधून निघणारा धूर, फटाक्यांमधून निघणारा धूर, स्वयंपाक करताना वापरल्या जाणार्या, लाकडाचा धूर...इत्यादीमध्ये असे कण असतात जे वातनलिकांना उत्तेजित करु शकतात.
उपयोगी सूचना:जर आपल्याला दमा असेल तर धुम्रपान करणे थांबवा. हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे.
धुम्रपान करणार्यांाना विनम्रपणे धुम्रपान न करण्याची विनंती करा इतकेच नाही तर आपल्यासाठी अप्रत्यक्ष धुम्रपान देखील चांगले नाही.
जर आपल्या कुटूंबातील सदस्य धुम्रपान करत असतील तर त्यांना घराबाहेर धुम्रपान करण्याची विनंती करा कारण सिगरेटचा धूर पडदे, कारपेट्समध्ये जातो आणि दीर्घ काळ त्यात भरलेला असतो.
जेव्हा प्रदुषण त्याच्या उच्च स्तरावर असते त्या दरम्यान प्रवास करणे टाळा.
|
 |
आपला व्यवसाय/कार्यस्थळ:
आपले कार्य किंवा आपल्या कार्याचे ठिकाण काहीवेळा ट्रिगर (उद्दीपक) बनू शकते. दागिना व्यवसायात, प्रिंटिंग, कीटकनाशक, खाण, रंगकाम आणि प्लास्टिक उद्योग, स्वयंपाकी आणि बेकरीमध्ये काम करणारे, सोल्डर्स आणि मेटल प्लेटर्स, फोम कर्मचारी आणि स्प्रे पेंटर्स, हेअर ड्रेसर्स आणि कारपेंटर्स यांच्यात दमा होण्याची शक्यता अधिक असते. कदाचित हा काही विशिष्ट रसायनांचा वास किंवा हवेतील कणांचा प्रभाव आहे जे फुफ्फुसातील उत्तेजनांचे कारण बनते.
उपयोगी सूचना: योग्य दक्षता घ्या, आपले कंट्रोलर योग्यपणे आणि नियमितपणे घ्या आणि आणि निश्चितपणे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जो आपल्यासाठी उत्कृष्ट आहे.
|
 |
सर्दी आणि व्हायरस:
सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शन्स दम्याची सामान्य ट्रिगर्स (उद्दीपके) आहेत. कारण कधी ना कधी प्रत्येकाला सर्दी होते किंवा कोणीतरी सर्दीने ग्रस्त असते त्यामुळे यापासून पूर्णपणे बचाव अशक्य आहे.
उपयोगी सूचना: चांगला आहार घ्या आणि स्वस्थ राहा. शक्य असेल तितक्यावेळा हात धुआ. आपल्या बोटांनी आपल्या चेहर्यांला स्पर्श करु नये.
|
 |
भावना:
तीव्र भावना, ताण इतकेच नाही तर खूप जास्त हसणे देखील दम्याची लक्षणे सक्रीय करू शकते.
उपयोगी सूचना: आपला ताण कमी करा आणि आपल्या आयुष्यात संतुलन कायम ठेवा.
|
 |
व्यायाम:
दम्याच्या रुग्णांसह प्रत्येकासाठी व्यायाम अतिशय चांगला आहे. परंतु काही लोकांना व्यायाम करताना किंवा त्यानंतर जास्त श्वारस लागतो. जर आपला दमा नियंत्रणात आहे तर आपल्याला व्यायाम कोणताही त्रास व्हायला नको. तथापि लक्षणे अधिक वाढली तर कृपया आपल्या डॉक्टारांशी संपर्क साधा.
उपयोगी सूचना:दम्यासाठी उत्कृष्ट व्यायाम म्हणजे योगासन आणि पोहोणे, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल (थोडे जलद चालणे) हे खेळ आहेत, कारण यात सतत पळण्याची आणि यात विश्रांती साठी परवानगी घेण्याची गरज नसते.
आपण व्यायाम करण्यापूर्वी किंवा व्यायामशाळेत जाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपल्या व्यायाम निर्देशकास किंवा शाळेतील खेळ कोचला आपल्या दम्या विषयी आणि आपल्या रिलीव्हर (आराम देणारी औषधी) किंवा रेस्क्युअर औषधी विषयी त्यांना सांगा. आपल्या औषधी लिखीत सूचनांसह नेहमी आपल्यासोबत बाळगा आणि अतिरिक्त रिलीव्हर(आराम देणारी औषधी)/रेस्क्युअर (बचाव औषधी) जवळ ठेवा.
|
 |
खाद्य पदार्थ:
दम्याच्या रुग्णांना खूप जास्त पथ्य पाळावे लागत नाहीत परंतु काही लोकांना शेंगदाणे, अंडी, मासे, गाईचे दुध, शेल मासे, यीस्ट उत्पादक, काही खाद्य रंग आणि प्रिजर्वेटिव्हज्, दारू, गॅस असलेले पेय, प्रक्रिया केलेले खाद्य यांची एलर्जी होऊ शकते. Click here to see how parents have no fear that asthma might harm their children
उपयोगी सूचना:प्रिझर्वेटिव्ह खाद्य पदार्थ आणि डब्बाबंद केलेले कृत्रिम खाद्य पदार्थ टाळा. हे देखील तपासा की आपल्याला शेंगदाणे, अंडी, गायीचे दुध, शेल मासे आणि यीस्ट उत्पादनांची तर एलर्जी नाही. डब्बाबंद असलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील लिखीत गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
एखादी एलर्जी चाचणी करण्याविषयी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
|
 |
हार्मोन्स:
होय, हार्मोन्स देखील दम्याचे ट्रिगर (उद्दीपक) बनू शकतात, विशेषत: स्त्रीहयांमध्ये. काहींमध्ये वयात येताना, त्यांच्या मासिक पाळी पूर्वी, गर्भावस्थे दरम्यान, आणि रजोनिवृत्ती दरम्यान दम्याची लक्षणे जाणवू शकतात.
उपयोगी सूचना: जर आपल्याला असे वाटते की हार्मोन्स आपल्या दम्याच्या लक्षणांना सक्रिय करु शकतात तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
|
 |
औषधी:
काही औषधी देखील लक्षणे सक्रीय करु शकतात. यात सर्दीपडसे, ह्रदयाचा त्रास, ग्लुकोमा इत्यादींच्या काही औषधी सामील आहेत.
उपयोगी सूचना: आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आपण घेत असलेल्या औषधींविषयी त्यांना सांगा.
|
 |
बुरशी, फंगस आणि परागकण:
परागकण असलेल्या फुलांची रोपे दम्याची लक्षणे सक्रीय करु शकतात. आपल्याला ओलसर भिंतीवरील, ओलसर कपडे, ओले बाथरुम आणि बगीच्यात पडणार्याी पानांच्या ढिगार्या वरील फंगसचे देखील लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
उपयोगी सूचना: आपले घर हवेशीर ठेवा. आपल्या घरातील भिंती ओलसर नसल्याचे सुनिश्चित करा.
|
 |
हवामान:
तापमानात अचानक होणारा बदल, वादळी दिवस, उन्हाळ्याचे दमट हवामानाचे दिवस देखील काही लोकांसाठी ट्रिगर्स (उद्दीपक) सारखे कार्य करु शकतात.
उपयोगी सूचना: धुके असताना पहाटेच्या सुमारास फिरायला जाणे टाळण्याचा प्रयत्न करा. वादळी दिवस असताना आपल्या चेहर्याटभवती एक स्कार्फ गुंडाळून ठेवा. अधिक तापमान असलेल्या भागात आत किंवा बाहेर जाणे टाळा...एखाद्या एअरकंडीशन खोलीतून एकदम दमट वातावरणात जाणे टाळा.
|
 |
मॉस्किटो कॉइल्स, रुम फ्रेशनर्स, साफसफाईची उत्पादने:
या उत्पादनातील रसायने काही लोकांसाठी ट्रिगर्स (उद्दीपके) बनू शकतात. वास्तविकत: चेस्ट रिसर्च फाउंडेशन, पुणे, इंडिया द्वारे केलेल्या एका स्वतंत्र शोध नुसार एक मॉस्किटो रिपेलेन्ट (कॉइल) जाळल्याने आपण 75 ते 137 सिगरेटींच्या बरोबरीच्या वायु प्रदुषण कणांच्या संपर्कात येता!
उपयोगी सूचना: डासांपासून बचावासाठी आपल्या खिडकीमध्ये जाळी लावा. प्रखर वासाची साफसफाईची उत्पादने टाळा आणि कृत्रिम रुम फ्रेशनर्सचा वापर न करता आपल्या खोल्या चांगल्या हवेशीर ठेवा.
|
कृपया लक्षात घ्याः एक जुनी म्हण आहे की, बचाव करणे चांगले…’. जर आपल्याला दमा आहे तर आपल्या ट्रिगर्स (उद्दीपके) वर लक्ष ठेवणे आणि त्यांच्यापासून बचाव करणे चांगले. आपले ट्रिगर्स (उद्दीपके), आपली लक्षणे, आणि आपल्या उपचारांविषयी कोणत्याही शंका असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
आपल्या खोकल्याविषयी अधिक जाणून घ्या |
जेव्हा आपण खोकलता तेव्हा आपल्या फुफ्फुसातून कण आणि स्त्राव बाहेर येतो ज्यामुळे आपली फुफ्फुसे साफ होतात. त्यामुळे खोकला आपल्या फुफ्फुसातील संसर्ग थांबविण्यात मदत करण्याची आपल्या शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे.
तथापि बर्यापचदा खोकल्यामुळे खूप त्रास होतो. खोकल्यामुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो आणि यामुळे आपली झोपमोड देखील होऊ शकते. जर आपल्याला खूप जास्त आणि सतत खोकला होत असेल तर हा आपल्या फुफ्फुसांमध्ये समस्या असल्याचा संकेत असू शकतो.
खोकला साधारणपणे तो होण्याच्या काळाच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणीत विभागले जाते. जर आपला खोकला 3 आठवड्यांपेक्षा जास्त वेळ होत असेल तर यास तीव्र (एक्यूट) खोकला म्हंटले जाते. जर आपला खोकला 8 आठवड्यांपेक्षा जास्त वेळ चालत असेल तर यास क्रॉनिक (दीर्घकाळ चालणारा) खोकला म्हटले जाते.
तीव्र खोकल्याची कारणे:
 |
व्हायरल अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (सर्दी, पडसे) |
 |
वातन लिकेमध्ये बाह्य कण |
क्रॉनिक (दीर्घकाळ चालणारा) खोकला किंवा सतत होणारा खोकला:
 |
दमा
दमा हे विशेषत: मुलांमध्ये क्रॉनिक (दीर्घकाळ चालणारा) खोकल्याचे सामान्य कारण आहे. दम्याशी संबंधित खोकला सतत, वारंवार किंवा दिवसमानानुसार असू शकतो. असे कदाचित एखाद्या अप्पर रेस्पीरेटरी इन्फेक्शनमुळे किंवा विभिन्न ट्रिगर्स (उद्दीपके) जसे की धूळीचे कीटाणू, पाळीव प्राणी, धुम्रपान आणि वायु प्रदुषण, ओलसरपणा इत्यादींमुळे स्थिती अधिक बिघडू शकते.
|
 |
ऍलर्जीक राहिनाइटिस (नाकाशी संबंधित एलर्जी)
दम्याच्या बर्यााच रुग्णांना देखील एलर्जीक राहिनाइटिस (नाकाशी संबंधित एलर्जी) असते कारण नाक श्वाबसोच्छवास मार्गाचा एक विस्तार आहे. सहसा प्रथम नाक प्रभावित होते आणि त्यानंतर फुफ्फुसे प्रभावित होतात. ऍलर्जीक राहिनाइटस हे ज्यात कशासाठी तरी ऍलर्जीक असलेले धूळ, क्रोध किंवा परागवहन असे एकत्रीकरण आहे एका श्वासात येते त्या लक्षणांना ऍलर्जीक राहिनाइटिस म्हणतात. लक्षणे ऋतुमानाप्रमाणे बदलणारे असू शकतात किंवा हे वर्षभर देखील राहू शकतात.
लक्षणं ही आहेत:
• वाहणारे नाक (नाकातून कायम वाहणारा पातळ पदार्थ)
• शिंका येणे
• नाक बंद होणे
• नाक खाजवणे ((नाक, डोळे किंवा टाळूला खाज सुटणे)
पोस्ट नसल ड्रिप (अर्थात जेव्हा नाकातून द्रव पदार्थ हळुहळु घश्यात उतरतो) मुळे उत्तेजित होते आणि खोकला येतो.
|
 |
रिफ्लक्स डिसीज
एसिड रिफ्लक्स अर्थात जेव्हा पोटातून एसिड आहार नलिकेत परत (रिफ्लक्सेस) येते. हे एखाद्या ट्रिगर (उद्दीपक) सारखे कार्य करते आणि क्रॉनिक (दीर्घकाळ चालणारे) उत्तेजन आणि खोकल्याचे कारण बनू शकते. |
 |
इन्फेक्शन्स
क्रॉनिक (दीर्घकाळ चालणारा) खोकल्याचा संबंध ट्यूबरक्युलोसिस आणि इतर क्रॉनिक (दीर्घकाळ चालणारा) फुफ्फुसांच्या इन्फेक्शन्सशी असतो. हा सहसा छातीतील दुखणे, झोपमोड, घोगरा आवाज आणि काही परिस्थितीत उलट्या आणि मूत्राशयावर नियंत्रण ठेवण्याची अक्षमतेसह होतो. |
नोट: लक्षात ठेवा की बर्याणच कफ सिरप्समध्ये हानीकारक उत्तेजक घटक असतात जे आपल्याला तात्पुरता आराम देऊ शकतात आणि आपल्या फुफ्फुसाच्या समस्या लपवू शकतात. त्यामुळे जर आपल्याला क्रॉनिक (दीर्घकाळ चालणारा) खोकला असेल जो 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून चालू आहे तर योग्य निदान आणि उपचारांसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
|
|
|
|
| पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर) |
|
| पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर)हे एक साधे, स्वस्त, हाताने हाताळण्यासारखे मशीन असून हे... |
| |
|
|
|
|
| स्पायरोमेट्री तपासणी ही एक जास्त संवेदनशील आणि अत्याधुनिक तपासणी असून यात त्वरीत दम्याची लक्षणं दिसून येतात. |
| |
|
|
|
|
|