Home
  Breathe Free
हा खोकला आहे
की दमा?
उपचार आणि
नियंत्रण
दम्याविषयी आपल्या प्रश्नांना उत्तरे
ऍलर्जिक
राहिनाइटिस
सिओपीडी

मान्यता आणि तथ्ये

इतर अनेक रोगांप्रमाणेच, दम्याबद्दल सुद्धा शंका, अफवा, मान्यता आणि चूकीची माहिती लोकांमध्ये पसरलेली आहे. काही लोकांना हा रोग संक्रामक वाटतो. इतर काहींना दमा मानसिक रोग आणि मनाचा भ्रम वाटतो. काहींना तर दमा गंभीर रोग नाही आणि त्यामूळे मृत्यू होऊ शकत नाही असे देखील वाटते. येथे आपण दम्याविषयीच्या काही शंका, वैद्यकिय अध्ययने आणि शास्त्रीय शोध यांचा आधार घेऊन स्पष्ट करणार आहोत.

मान्यता

इनहेलर्सच्या नियमित वापराने सवय किंवा व्यसन लागू शकते.
तोंडावाटे औषधोपचार, म्हणजे गोळ्या आणि सिरप इनहेलेशन थेरेपी पेक्षा चांगले असते.
गोळ्या/सिरप पेक्षा इनहेलर्स महाग आहेत
दम्याच्या श्वसनमार्गातून औषधोपचारात /इनहेलर्समध्ये स्टिरॉइड्स असतात आणि म्हणून त्यांचा उपयोग दम्याचा गंभीर त्रास असणार्यां्साठीच केला जातो.
दमा येतो आणि जातो. नेहमीसाठी नसतो.
दमा पूर्णपणे ठीक होऊ शकतो.
दमा असला तर सामान्य आयुष्य जगता येत नाही
दमा असल्याने आपण व्यायाम करू शकत नाही आणि खेळ खेळू शकत नाही.
पूरक आणि वैकल्पिक उपचार माझ्या दम्यावर नियंत्रण ठेवण्यात मला मदत करतील.
दमा एका व्यक्तीकडून दुसर्यासकडे पसरतो
गरोदर स्त्रीने दम्यासाठी इनहेलर्स वापरू नये
पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर ) महाग आणि वापरण्यासाठी कठीण आहे.
जर एखाद्याच्या पालकांना दमा असण्याचा इतिहास नसेल तर त्याला दमा होणार नाही.
जेव्हा आपण मोठे होता तेव्हा दमा जातो किंवा तो ठीक होतो.
जेव्हा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो फक्त तेव्हाच आपल्याला दमा असतो.
दम्याचा अॅलटॅक अचानक येतो आणि त्वरीत गंभीर होतो.
इनहेल्ड स्टिरॉइड्स लहान मुलांसाठी नसून केवळ गंभीर दमा असणार्या वयस्क रुग्णांसाठी असतात.
दम्याची लक्षणे प्रत्येकासाठी सारखीच असतात.
दम्यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकत नाही?



मान्यता:

इनहेलर्सच्या नियमित वापराने सवय किंवा व्यसन लागू शकते .

तथ्य:
नाही, इनहेलर्सची सवय लागत नाही. केवळ आपल्याला दररोज औषध घ्यावे लागते याचा अर्थ असा नाही की त्याचे व्यसन लागते. आपण दररोज दात घासण्यास सवय लागली असे म्हणाल काय? किंवा दूध पिण्यास? किंवा रोज स्नान करण्यास? तसेच याच धर्तीवर, दम्याच्या त्रासासाठी इनहेलर्स वापरणे ही चांगली सवय आहे जी आपल्याला दम्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. म्हणूनच याचे व्यसन ही चांगली सवय आहे.

See how Shivangi's mother believes that Inhalation therapy has no side effects.

यद्यपि, जर आपल्याला असे वाटत असेल की आपण आपले रिलीव्हर (त्वरीत आराम देणारे) औषध जरा जास्त वेळा घेत आहात तर याचा अर्थ असा आहे की आपण कंट्रोलर औषध योग्यरितीने घेत नाही. आपल्या डॉक्टरांना भेटणे आणि योग्य मार्गदर्शन घेणे सर्वात चांगले ठरेल.


मान्यता:

तोंडावाटे औषधोपचार, म्हणजे गोळ्या आणि सिरप इनहेलेशन थेरेपी पेक्षा चांगले असते.

तथ्य:
नाही, तोंडावाटे औषधोपचार हा इनहेलेशन थेरेपी पेक्षा चांगला नाही अ‍ाणि हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा शोध करण्यात आलेला आहे. बर्याीच देशांमध्ये, इनहेलेशन थेरेपी गोळ्या आणि सिरपपेक्षा जास्त यशस्वी ठरली आहे, कारण ती अधिक प्रभावी, सुरक्षित असून दमा नियंत्रित करण्याचा कमी खर्चिक मार्ग आहे.

भारतातील बरेच रूग्ण आजाराच्या उपचारांसाठी अद्याप औषध तोंडावाटे घेणे हेच योग्य आणि सिद्ध मार्ग असल्याचे मानतात. तथापि शास्त्रीय अध्ययने हे सिद्ध करतात की दम्याची औषधं घेण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे इन्हेलेशन आहे. ओरल थेरेपीला म्हणजे तोंडावाटे घेतल्या जाणार्या गोळ्या आणि सिरप यांना पोटातून रक्तप्रवाहात आणि शेवटी फुप्फुसांमध्ये पोहोचून त्यांचे कार्य सुरू करण्यास वेळ लागतो. तर इन्हेलेशन थेरेपी ही त्वरीत असते कारण औषध आवश्यक असलेल्या ठिकाणीच थेट दिले जाते, म्हणजे फुप्फुसांमध्ये.

जसे आपण डोळ्यात संक्रमण झाले असताना डोळ्यात ड्रॉप्स घालता, किंवा त्वचेवर घाव झाला असेल तर मलम लावता, तसेच इनहेलेशन थेरेपी एक शॉर्टकट आहे, जी थेट आपल्या फुफ्फुसात पोहोचते आणि समस्येचे निराकरण करते.

याशिवाय, ओरल (गोळ्या आणि सिरप) थेरपीमध्ये, आपल्याला मोठ्या डोसची मिलिग्रॅम्समध्ये आवश्यकता असते (इन्हेलेशन थेरपीपेक्षा बहुदा 40 पट जास्त) म्हणजेच मोठे साइड इफेक्ट्स. इन्हेलेशन थेरेपीमध्ये, औषध मायक्रोग्रॅम्समध्ये असते आणि शरीराच्या इतर कोणत्याही भागात फारच कमी प्रमाणात पोहोचू शकते, त्यामुळे आपल्याला कमी सहपरिणाम होतात.


मान्यता:

गोळ्या/सिरप पेक्षा इनहेलर्स महाग आहेत

तथ्य:
नाही, गोळ्या आणि सिरप पेक्षा इनहेलेशन थेरेपी जास्त महाग नाही. खरेतर, इनहेलर्सचा दररोजचा खर्च गोळ्या/सिरपपेक्षा कमी आहे. भारतात, इनहेलर्सची विशेष किंमत ठरवण्यात आली आहे जेणे करून ते सर्वांना खरेदी करता येईल आणि याचा खर्च फक्त काही रूपये आहे. तोंडावाटे घेण्याची काही औषधे इनहेलर्स पेक्षा जास्त महाग देखील आहेत. या व्यतिरिक्त, गोळ्यांनी होणारी हानी दीर्घावधीत आपल्या आरोग्यासाठी खरोखर महाग पडते.


मान्यता:

दम्याच्या श्वसनमार्गातून औषधोपचारात /इनहेलर्समध्ये स्टिरॉइड्स असतात आणि म्हणून त्यांचा उपयोग दम्याचा गंभीर त्रास असणार्यां्साठीच केला जातो.

तथ्य:
इन्हेल्ड औषधोपचार केवळ गंभीर दमा असणार्याथ रुग्णांसाठी नाही. दमा ही फुफ्फुसांची जळजळ (सूज) असण्याची स्थिती आहे. फुफ्फुसांच्या जळजळीचा सर्वात चांगला उपचार स्टीरॉइड्स आहेत, आणि त्यांना घेण्याचा सर्वात प्रभावशाली मार्ग इनहेलेशन थेरेपी आहे. जेव्हा आपण इनहेलेशन थेरेपी घेता तेव्हा, स्टीरॉइड औषध थेट फुफ्फुसात जाते आणि त्याचे कमीत कमी सहपरिणाम (साइड इफेक्ट) होतात. इनहेलर्स केवळ गंभीर दमा असणार्यार रुग्णांसाठी नाहीत. तर मध्यम प्रमाणात दम्याचा त्रास असणार्याल रुग्णांना देखील यांची शिफारस केली जाते.

पाहूया इनहेलेशन मुळे कमीत कमी सहपरिणाम (साइड इफेक्ट्स) होतात याबाबत पालक कसे सहमत आहेत

जेव्हा स्टिरॉइड्स गोळ्यांच्या रूपात घेतली जातात तेव्हा त्यांचा डोस मोठा असतो (एका स्टिरॉइट गोळीत एका मानक स्टीरॉइड इनहेलरने श्वासाने घेतल्या गेलेल्या औषधाच्या तुलनेत 40 पट अधिक औषध असते) आणि त्याच्या अधिकांश भाग फक्त फुफ्फुसातच नव्हे तर शरीराच्या इतर भागांतही शोषून घेतला जातो. स्टिरॉइड गोळ्यांच्या दीर्घकाल पर्यंत नियमित सेवनामुळे गंभीर सहपरिणाम (साइड इफेक्ट) होऊ शकतात जसे की हाडे अशक्त होणे (अस्थिभंगुरता), वजन वाढणे, थकवा, मधुमेह, मोतीबिंदु, छातीत जळजळ आणि अपचन. यामुळे आपल्याला उदास वाटणे (डिप्रेशन), किंवा वारंवार मनस्थिती बदलणे (मूड स्वींग) किंवा चेहरा मांसल दिसणे (मून फेस) होऊ शकते.

आपल्या कंट्रोलरमध्ये असलेले स्टिरॉइड सामान्यतः कॉर्टिकोस्टिरॉईड असते, परंतु ते सुरक्षित असते. कॉर्टिकोस्टिरॉईड्स स्टिरॉईड्सची कॉपी असतात जी आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार केली जातात. अशा रितीने दम्यासाठी हा खूप सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहे. आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की ही ती स्टिरॉइड्स नाहीत ज्यांचा गैरवापर एथलिट्स आणि शरीर सौष्ठवपटू करतात. तथापि, सर्वच इनहेलर्समध्ये स्टिरॉईड नसते, काहींमध्ये त्वरीत आराम देणारे औषध असते.

आपल्या स्थितीनुसार, प्रसंगानुरूप डॉक्टर स्टिरॉइड गोळ्या लिहून देऊ शकतात. कमी कालावधीसाठी घेतल्यास, त्यांचे हानीकारक प्रभाव होणार नाहीत.


मान्यता:

दमा येतो आणि जातो. नेहमीसाठी नसतो.

तथ्य:
दम्याची लक्षणे म्हणजे, छातीत घुसमट, श्वास लागणे, खोकला आणि श्वासाची घरघर लागणे, यांचा त्रास कमी किंवा जास्त होऊ शकतो परंतु दमा नेहमीसाठी असतो. असा एक सामान्य गैरसमज आहे की दमा येतो आणि जातो आणि एखाद्याने औषध फक्त लक्षणे दिसल्यानंतरच घ्यावी.

हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की दमा हा क्रॉनिक (दीर्घावधी) आजार आहे ज्याच्या उपचारासाठी रोग्याने त्यावरील औषधे आजाराची लक्षणे दिसत नसताना देखील सतत घेतली पाहिजेत.

दम्याचे मूळ कारण फुफ्फुसातील वातनलिकांमधील सूज असल्याने, जर आपण लक्षणे दिसत नाहीत म्हणून औषधे घेणे थांबवले तर, आपण स्वत:ला मोठी हानी पोहोचवत आहात, आणि जेव्हा आपल्याला अॅधटॅक येईल तेव्हा बरे होण्यासाठी जास्त वेळ लागेल.


मान्यता:

दमा पूर्णपणे ठीक होऊ शकतो.

तथ्य:
वैद्यक शास्त्राने बरीच प्रगती केलेली असली तरीही, दुर्देवाने दमा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. अगदी होमियोपॅथी किंवा आयुर्वे किंवा फिश थेरेपी किंवा योग कशानेही दमा ठीक होत नाही.

See how mothers around India moved to inhalation after trying out various alternative medicines.

तथापि अॅललोपॅथीमध्ये, याचे उपचार आहेत, जेणेकरून त्यावर सर्वात चांगले नियंत्रण ठेवता येईल. चित्रपट तारे, क्रिडापटू आणि व्यावसायिक यांच्यासारखे असे बरेच यशस्वी लोक आहेत ज्यांना दमा आहे परंतु त्यांनी त्यास आपण ठरवलेल्या ध्येयाच्या मार्गात अडसर बनू दिले नाही. म्हणून आपल्याला दमा असेल तर, त्यामुळे थांबून राहू नका. नियमित उपचारांनी दम्यावर पूर्ण नियंत्रण शक्य आहे. लक्षात ठेवा की आपल्याला दम्याची बरीच लक्षणे दिसत नाहीत याचा अर्थ असा नाही की आपला दमा गेलेला आहे.


मान्यता:

दमा असला तर सामान्य आयुष्य जगता येत नाही

तथ्य:
दमा असूनही आपण एक सक्रीय आणि निरोगी आयुष्य जगू शकता. जर आपल्याला किंवा आपल्या मुलाला दमा असेल तर, आपण निश्चिंत रहा की आपण शक्य तितके सामान्य आयुष्य जगू शकाल. जर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला पाळला, दम्याबद्दल स्वत: माहिती करून घेतली, आपले इनहेलेशन औषधोपचार डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे योग्यरितीनेे घेतले, आणि आपले ट्रिगर्स (उद्दीपके) टाळले, तर दमा आपल्या स्वप्नांच्या आणि आपल्या आयुष्यात अडथळा निर्माण करू शकणार नाही. अनेक यशस्वी पुरुष आणि स्त्रियांना ज्यांच्यात - चित्रपट तारे, राजकारणी,व्यावसायिक, डॉक्टर्स, क्रिकेटर्स, अगदी ऑलिंपिक स्पर्धांमधले सुवर्णपदकजेते सुद्धा सामील आहेत, ज्यांना दमा आहे आणि तरीही ते सामान्य, सक्रिय आयुष्य जगताहेत.


मान्यता:

दमा असल्याने आपण व्यायाम करू शकत नाही आणि खेळ खेळू शकत नाही.

तथ्य:
दमा असला तरीही आपण व्यायाम करू शकता आणि खेळ खेळू शकता, परंतु आपण आपली औषधे नियमितपणे घेतली पाहिजेत. पोहोणे दम्यासाठी चांगले असते. या विपरीत, काही लोकांसाठी कोरड्याष, थंड हवेत व्यायाम करणे ट्रिगर (उद्दीपक) असू शकते. हे महत्वाचे आहे की आपल्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपले कंट्रोलर औषध नियमितपणे घ्यावे. दम्याचा त्रास असणार्याट काही जणांना व्यायामाआधी रिलीव्हर(आराम देणारे औषध) घेतल्याने फायदा होतो त्यामुळे आपले रिलीव्हर हाताशी ठेवा. खबरदारी म्हणून, अतिरिक्त औषध सोबत ठेवण्यास विसरू नका. आपले टीम सदस्य, आपले मित्र, आपल्या जिमचे इन्स्ट्रक्टर किंवा आपल्या प्रशिक्षकास आपल्याला अॅलटॅक आल्यास त्यांनी काय करावे याची माहिती द्या.

दम्यासाठी उत्कृष्ट व्यायाम म्हणजे योगासन आणि पोहोणे आणि स्प्रिंटिंग (थोडे जलद चालणे) हे खेळ आहेत, कारण यात सतत पळण्याची आणि यात विश्रांती साठी परवानगी घेण्याची गरज नसते. जर आपण व्यायाम आणि खेळांविषयी गंभीर आहात तर कृपया नियमितपणे आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

आपल्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात दम्याला अडथळा बनू देऊ नका. हा कोणत्याही खेळात किंवा जीवनात यशस्वी होण्यात अडथळा होऊ शकत नाही. मोठ्या क्रिकेटपटूंना दमा आहे, जलतरणपटूंना दमा आहे आणि आपल्याला हे माहिती करून आश्चर्य वाटेल की अनेक ऑलिंपिक सुवर्णपदकजेत्यांना सुद्धा दमा आहे.


मान्यता:

पूरक आणि वैकल्पिक उपचार माझ्या दम्यावर नियंत्रण ठेवण्यात मला मदत करतील.

तथ्य:
नाही! पूरक/वैकल्पिक उपचारांपैकी काही जसे की होमियोपॅथी, आयुर्वेद, हर्बल थेरेपी, अॅहक्यूपंक्चर आणि फिश थेरेपी, आपल्याला दम्यावर नियंत्रण ठेवण्यात मदत करणार नाहीत. त्यांचा प्रभावीपणा दर्शवणारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. शोध दर्शवतात की या उपचारांमुळे दमा नियंत्रित करण्यासाठी काही मदत होते असे सिद्ध झालेले नाही. या व्यतिरिक्त, या उपचारांच्या सुरक्षितते विषयी माहिती नसल्याने रुग्णावर होणार्यान सहपरिणामांची (साइड इफेक्ट्स) जोखीम रहाते.

कृपया लक्षात घ्या की दम्याचा अॅाटॅक आल्यास पूरक औषधे मदत करू शकणार नाहीत. ती औषधे आपल्या इनहेलेशन उपचांरांच्या ऐवजी वापरण्यासाठी बनलेली नाहीत. म्हणून आपला मुख्य औषधोपचार सोडू नका, आपण जरी यापैकी एखादा उपचार करण्याचा निर्णय घेतला असला तरीही. सर्वप्रथम पूरक उपचारांविषयी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि त्याच्या सल्ल्यानेच पुढचे पाऊल उचला.

पाहूया दम्याचे रुग्ण असलेल्या मुलांचे पालक वैकल्पिक औषधोपचार अयशस्वी ठरल्यानंतर इनहेलेशनकडे कसे वळले.



मान्यता:

दमा एका व्यक्तीकडून दुसर्यासकडे पसरतो

तथ्य:
नाही, दमा संक्रमणजन्य नाही. आपल्याला इतर कुणाकडूनही दमा होऊ शकत नाही, आणि घरात इतर कुणालाही किंवा कार्यस्थानी इतर कुणालाही दमा असल्याने आपल्याला संक्रमण होऊ शकणार नाही.


मान्यता:

गरोदर स्त्रीने दम्यासाठी इनहेलर्स वापरू नये

तथ्य:
जर एक लहान मूल दम्यासाठी इनहेलर वापरू शकते तर एक गरोदर महिला सुद्धा घेऊ शकते. खरेतर, गरोदर स्त्रीने दम्यासाठी इनहेलर नियमितपणे वापरले पाहिजे जेणेकरून तिचे बाळ निरोगी रहाण्याची शक्यता रहावी. आजच्या काळातील इनहेलर्स खूप सुरक्षित आहेत, अगदी स्तनपान देणार्याी माता देखील बाळाला नुकसान न पोहोचवता इनहेलर वापरू शकतात. कारण इनहेल करण्याच्या औषधातील डोस गोळ्यांपेक्षा 40 पट कमी असतो.



मान्यता:

पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर ) महाग आणि वापरण्यासाठी कठीण आहे.

तथ्य:
जसे आपल्याकडे रक्त दाब तपासण्यासाठी BP रीडिंग मशीन आणि मधुमेह तपासण्यासाठी ग्लूकोमीटर असते, तसे पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर) दम्यासाठी थर्मामीटर सारखेच आहे. हे एक लहान सहज ने-आण करता येईल असे उपकरण आहे जे कमी किमतीचे, यूझर फ्रेंडली आणि देखरेख व वापरासाठी सोपे आहे. आपल्या दम्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्याचे अनुमान लावून दम्याच्या अॅखटॅकचा प्रतिबंध करण्यासाठी याचा वापर आठवड्यासतून दोनदा करण्याची शिफारस केली जाते. जर आपल्याला दमा असेल आणि पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर) ने आपल्या फुफ्फुसांचे परीक्षण करताना रीडिंग कमी असल्याचे जाणवले तर, याचा अर्थ असा आहे की आपला दमा नियंत्रणाखाली नाही आणि आपल्याला नजीकच्या भविष्यात किंवा काही दिवसातच अॅफटॅक येण्याची शक्यता आहे. हे आपल्या औषधोपचाराचे डोस किंवा औषधांच्या वेळा वाढविण्यासाठी आधीच मिळालेल्या चेतावणीसारखे आहे. जेव्हा पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर) चे रीडिंग सामान्य असते, तेव्हा ते आपला दमा नियंत्रित असल्याचे सुचवते.


मान्यता:

जर एखाद्याच्या पालकांना दमा असण्याचा इतिहास नसेल तर त्याला दमा होणार नाही.

तथ्य:
जर कुटुंबात कुणाला अॅंलर्जी असण्याचा जरी इतिहास असेल तरीही आपल्याला दमा होऊ शकतो, म्हणजेच केवळ पालकच नव्हे तर भावंड, आजी आजोबा,जवळचे कुटुंबीय म्हणजे काका, आत्या यांना कुणाला असेल तरीही. तसेच ट्रिगर्स (उद्दीपक) देखील दम्याच्या अॅेटॅकचे कारण असू शकते.


मान्यता:

जेव्हा आपण मोठे होता तेव्हा दमा जातो किंवा तो ठीक होतो.

तथ्य:
दमा आयुष्यभर रहाणारी स्थिती आहे. लहान मुलांमध्ये दमा काळाप्रमाणे बरा किंवा अधिक वाईट होऊ शकतो आणि काही खूप लहान मुलांचा दमा ती (आणि त्यांची फुफ्फुसे) मोठी झाल्यांनतर ठीक होतो, परंतु अधिकांश लोकांमध्ये, दमा आयुष्यभर रहातो.


मान्यता:

जेव्हा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो फक्त तेव्हाच आपल्याला दमा असतो.

तथ्य:
दम्याचा त्रास असणार्याालोकांना दमा नेहमी असतो. ही एक क्रॉनिक (दीर्घावधी) स्थिती आहे आणि वातनलिकेतील जळजळ (सूज) नेहमी असू शकते, होय, जेव्हा बरीच सारी लक्षणे दिसत नसतील तेव्हाही. या व्यतिरिक्त असे बरेच वैद्यकीय पुरावे आहेत जे हे सिद्ध करतात की वातनलिकेतील सूज घालवण्यासाठी उपचार केले नाहीत तर, फुफ्फुसांच्या ताकदीवर त्याचा कायमचा परीणाम होऊ शकतो. आपली दैनिक कंट्रोलर औषधे नियमितपणे घेऊन आणि दमा ट्रिगर्स (उद्दीपके) टाळून दम्यावर नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे आहे.


मान्यता:

दम्याचा अॅलटॅक अचानक येतो आणि त्वरीत गंभीर होतो.

तथ्य:
अधिकतर दम्याचा अॅगटॅक हळूहळू वाढतो – म्हणजे सामान्यत: एक किंवा दोन दिवस आधी व्यक्तीला बरे वाटत नाही, उदा., जरा धाप लागणे किंवा अॅशटॅक येण्याआधी घरघर होणे. म्हणून आपल्या छातीत होणार्या जळजळीकडे नीट लक्ष ठेवा, आपली लक्षणे ओळखायला शिका (छातीत घट्टपणा, धाप लागणे, खोकला आणि घरघर) जर आवश्यक वाटले तर दम्याची दैनिक डायरी ठेवा, आणि आपल्या ट्रिगर्सच्या (उद्दीपकांच्या) संपर्कात येण्याचे टाळा.

हे देखील महत्त्वाचे आहे की आपण सामान्य हाताळणारे पीक फ्लो मीटर (ब्रीदोमीटर ) दम्याच्या अॅपटॅकचे अनुमान लावण्यासाठी आणि अॅपटॅकचा प्रतिबंध करण्यात मदत व्हावी म्हणून वापरावा. कृपया लक्षात ठेवा की आपल्याला दम्याची बरीच लक्षणे दिसत नाहीत याचा अर्थ असा नाही की आपला दमा गेलेला आहे.


मान्यता:

इनहेल्ड स्टिरॉइड्स लहान मुलांसाठी नसून केवळ गंभीर दमा असणार्या वयस्क रुग्णांसाठी असतात.

तथ्य:
इनहेल्ड स्टिरॉइड्सिची शिफारस स्थायी दमा असलेल्या वयस्क आणि लहान दोन्ही रुग्णांसाठी केली जाते. इनहेल्ड स्टिरॉइड्सतचा उपयोग मध्यम आणि गंभीर स्थायी दमा असलेल्या लहान मुलांमध्ये कमी डोस ठेवून करण्याची शिफारस केली जाते. या व्यतिरिक्त, इनहेल करताना, गोळ्या आणि सिरप पेक्षा 40 पट कमी डोस घ्यावा लागतो. आणि औषध सर्वात जास्त गरज असलेल्या भागात, म्हणजेच फुफ्फुसात पोहोचते, याचे सहपरिणाम (साइड इफेक्ट्स) बरेच कमी आणि हानीकारक नसतात.


मान्यता:

दम्याची लक्षणे प्रत्येकासाठी सारखीच असतात.

तथ्य:
दमा प्रत्येकास वेगवेगळ्या तर्हेचने प्रभावित करू शकतो. एकाच व्यक्तीत विविध लक्षणे, जसे की घरघर,छातीत घट्टपणा,आणि थकवा असू शकतो तर एखाद्याला फक्त खोकला असू शकेल. आपण आपल्या लक्षणांबद्दल जागरुक असले पाहिजे ज्यामुळे आपल्याला त्वरीत मदत मिळू शकेल.


मान्यता:

दम्यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकत नाही?

तथ्य:
दुर्दैवाने, होय, एखाद्याचा दम्याने मृत्यू होऊ शकतो. WHO (जागतिक आरोग्य संघटना) च्या अपडेटनुसार, दम्यामुळे दरवर्षी संपूर्ण जगात सुमारे 2,50,000 लोक मृत्यूमुखी पडतात

प्रथम अवस्थेत जर दम्याचे निदान झाले नाही तर मृत्यू होण्याची शक्यता असते. किंवा अॅरटॅक आला तेव्हा जर रूग्णाकडे रिलीव्हर (त्वरीत आराम देणारे औषध) हाताशी नसेल तर.

मृत्यूची शक्यता असलेल्या रुग्णास ओळखण्याचा एक उत्कृष्ट मार्ग म्हणजे, तो रुग्ण बराच ब्राँकोडिलेटर इनहेलर घेत असावा (प्रति दिवस दहा पफस्, किंवा दरमहा दोन किंवा अधिक इनहेलर्सची आवश्यकता असावी), ही लक्षणं दमा नियंत्रणाबाहेर गेल्याची आहेत. ज्यांना रुग्णालयात वारंवार नेब्यूलायझेशनसाठी जावे लागते त्यांना देखील जोखीम आहे.

दमा सर्व प्रकारच्या समाजातील आणि सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करतो, हा घातक प्रवृत्तीचा आजार असला तरीही, बर्या्च प्रकरणात त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. दम्यामुळे होणारे बरेच मृत्यू थांबविले जाऊ शकतात. म्हणून कृपया आपल्या किंवा आपल्या मुलाच्या दम्याचे व्यवस्थापन गांभीर्याने करा.