|
एक पालक म्हणून आपल्याला आपले मूल आनंदी, निरोगी आणि चांगले असावे असे वाटते. आपल्या मुलाला दमा असला तरीही आपण अशी आशा बाळगू शकता. हे असे कारण योग्य उपचारांनी दमा पूर्णपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. म्हणून कृपया आपल्या मुलास दमा असल्यास काळजी करू नका. केवळ आमची फिल्म “दम्यावर विजय” क्लिक करा. दमा असलेली मुले प्रत्येकगोष्ट सामान्य मुलाप्रमाणे कशी करतात ते पाहा. आपला मुलगा देखील प्रत्येकगोष्ट करू शकतो असा आपल्याला विश्वास वाटेल. होय, नियमित शाळेत जाऊ शकतो, आईस्क्रीम खाऊ शकतो आणि अगदी धावपळीचे खेळ सुध्दा खेळू शकतो.
मुलांमध्ये असलेला दमा हा प्रौढांच्या दम्यापेक्षा वेगळ असतो. मुलांमध्ये दम्याची संभाव्य विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत – धाप लागणे, श्वासोच्छ्वासातील घरघर, कफ आणि छाती भरल्यासारखे वाटणे. याशिवाय प्रत्येक मुलाचा दमा वेगळा असतो. काही मुलांना हलका दमा तर इतरांना गंभीर दमा असतो. काहींना वारंवार कफ आणि काहींना ऍलर्जी होऊ शकते.
दमा हा मुलांना होणारा सर्वात क्रॉनिक (दीर्घकाळ राहणारा) आजार विकार आहे. यूकेमधल्या 11 पैकी 1 मुलाला दमा आहे. यूएसए (USA) मध्ये 70 लाख मुलांना दमा आहे. भारतात, जवळपास दर 12 पैकी 1 मुलाला दमा आहे. म्हणून, आपल्या मुलाला दमा असल्याचे निदान झाले, तरी काळजी करू नका. आपण एकटे नाही.
होय, अनेक पालक काळजी करतात की दमा हा एक सामाजिक कलंक असून यामुळे त्यांच्या मुलांच्या भविष्यावर परिणाम होईल. म्हणून ऍलोपॅथिक डॉक्टर हे निदान करतात की त्यांच्या मुलाला दमा आहे, ते आणखी दुसर्याॉचा सल्ला घेतात आणि एक उपचार सोडून दुसरे उपचार घेतात, हाच विचार करून की ऍलोपॅथीमध्ये साइड इफेक्ट्स असून दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. परंतु दम्याबद्दल या सर्व शंका आहेत. आपण पुढे वाचत जाल तसे, आपल्याला आपल्या शंकांचे उत्तर मिळेल आणि आपल्या मुलाचा दमा नियंत्रित करण्यासाठी मदत कशी करावी हे सुध्दा माहिती होईल. |
|